आठ जणांना अटक:बनावट नोटा चलनात खपवू पाहणाऱ्या टोळीचा पोलिसांनी केला पर्दाफाश; खेळण्यातील नोटांचाही वापर

बनावट नोटांच्या बंडलवर लावल्या होत्या ५००च्या नोटा.

0

रयतसाक्षी :लहान मुलांच्या खेळण्यातील बनावट नोटा चलनात आणण्याचे आमिष दाखवत त्या बदल्यात खऱ्या नोटा उकळू पाहणाऱ्या टोळीचा ख्ुलताबाद पोलिसांनी पर्दाफाश केला. या प्रकरणी आठ जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून ३६ लाख रुपयांच्या बनावट नोटांसह ४ हजार रुपये, एक कार, ४ दुचाकी, मोबाइल जप्त करण्यात आले आहेत.

 

किशोर ऊर्फ ईश्वर रामदास हतपुरे, प्रकाश ऊर्फ अण्णा लक्ष्मण शिंदे (रा. पेनबोरी, ता. रिसोड, जि. वाशिम), दिलीप दगडू मंजूरकर (रा. जयगाव, जि. वाशिम), बाबासाहेब आबाराव आवारे (रा. घोडेगाव, ता. खुलताबाद), अरुण तुकाराम घुसळे, किशाेर गाेरख जाधव (रा. शूलिभंजन, ता. खुलताबाद), भय्यालाल बारीकराव शिकरूपे (रा. राधास्वामी काॅलनी, जटवाडा) सत्यपाल चंदू ठोले (रा. पेनबोरी, जि. वाशिम) यांना अटक करण्यात आली.

 

औरंगाबाद येथील मोहंमद अलियोद्दीन यांच्याशी गोळेगाव (ता.खुलताबाद) येथील किशोर हतपुरे यांची एका जमीन व्यवहारात ओळख झाली होती. किशोरने अलियोद्दीन यांना १० लाखांच्या मोबदल्यात ४० लाख रुपयांच्या बनावट नोटा देण्याचे आमीष दाखवले. त्यावर अलियोद्दीन यांनी पोलिसांना कळवले. ठरल्याप्रमाणे ६ ऑगस्ट रोजी काटशेवरी फाटा (ता. खुलताबाद) येथे बनावट नोटा घेऊन १० लाख रुपये घेण्या-देण्याचा व्यवहार ठरला आणि आरोपी पोलिसांच्या सापळ्यात अडकले. पोलिस निरीक्षक रामेश्वर रेंगे, पोलिस उपनिरीक्षक प्रदीप दुबे, सहायक फौजदार गजानन लहाने, संजय काळे, पोलिस हवालदार विठ्ठल राख, संतोष पाटील, किरण गोरे, गणेश सांगावे यांनी ही कारवाई केली.

बनावट नोटांच्या बंडलवर लावल्या होत्या ५००च्या नोटा
आरोपींनी या व्यवहारात द्यावयाच्या ४० लाखांच्या नोटांच्या बंडलमध्ये खेळण्यातील ३९ लाख रुपये मूल्याच्या नोटा ठेवल्या होत्या. या नोटा ज्यांच्याशी व्यवहार करावयाचा आहे त्यांना ओळखू येऊ नयेत म्हणून बंडलवर व खालच्या बाजूला ५०० रुपयांच्या खऱ्या नोटा जोडल्या होत्या. मात्र, ज्याच्याशी व्यवहार ठरला त्यानेच पोलिसांना या व्यवहाराची माहिती दिल्याने या टोळीचा प्रयत्न फसला आणि सारे आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.