राज्याच्या मंत्रीमंडळ विस्तार हालचालींना वेग

१५ ते १६ जन मंत्रीपदाची शपथ घेणार!, स्वच्छ प्रतिमांच्या आमदारांनाच संधी , शिंदे गटाचे अब्दुल सत्तार, संजय राठोड यांचा पत्ता कट!

0

रयतसाक्षी: राज्याचा सत्तासंघार्ष थेट मा. सर्वोच्च न्यायालयात पोचल्याने मंत्रीमंडळ विस्तारा बाबत तर्क वितर्क लढवले जात आहेत. शनिवारी दि. ६ दिल्लीवारी नंतर सोमवारी दि.८ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये बैठक झाली, यामध्ये उद्या मंगळवार दि.९ मंत्रीमंडळ विस्तार होणार असल्याचे खात्रीशीर वृत्त आहे. दरम्यान, स्वच्छ प्रतिमांच्या आमदांरानाच मंत्रीमंडळात स्थान दिले जाणार असल्याचा अलिखीत संदेश जारी करण्यात आल्याने शिंदे गटातील अब्दुल सत्तार आणि संजय राठोड यांचा पत्ता कट झाल्याचे बोलले जात आहे तर भाजपकडून मातब्बरांची नावे चर्चेत आहेत.

 

राज्याच्या शिंदे- फडणविस सरकारच्या मंत्रीमंडळ विस्तारास होणाऱ्या विलंबावरून राजकारण चांगलेच तापले आहे. विरोधी पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांनी मंत्रीमंडळ विस्ताराठी आंदोलन छेडण्याची दुर्दैवी वेळ येण्याचा भाकीत इशारा देण्यात आला होता. मंत्रीमंडळ विस्तार लांबणीवर पडल्याने शिंदे-फडणवीस सरकारने सचिवांनाच मंत्र्याचे अधिकाराचा विरोधी पक्षाने चांगलाच समाचार घेतला.

 

विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट घरी बसण्याचा उपसात्मक सल्ला देत सरकारच्या कारभाराचे वाभाडे काढले होते. शनिवारी दि.६ दिल्ली दौऱ्या नंतर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवास्थानी मुख्यमंत्री एकनाथ् शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात बैठकीद्वारे उद्या मंगळवार दि. ९ रोजी  मंत्रीमंडळ विस्तार करण्याबाबत सविस्तर चर्चा झाली.

 

यामध्ये भाजपचे नऊ तर शिंदे गटाचे नऊ आमदार मंत्रीपदाची शपथ् घेणार असल्याची सुत्रांची माहिती आहे. भाजपकडून पहिल्या टप्यात ज्येष्ठ मंत्र्यांना शपथ दिली जाणार आहे. दरम्यान, स्वच्छ प्रतिमांच्या आमदारांचाच मंत्रीमंडळात समावेश केला जाणार असल्याचे बोलले जात असल्याने शिंदे गटाचे माजी मंत्री संजय राठोड व आत्ताच टीईटी प्रकरणावरून वादात सापडलेले माजीराज्य मंत्री अब्दुल सत्तार यांच्या मंत्रीपदा बाबत प्रश्न निर्माण झाला आहे.

 

भजपकडून हि नावे चर्चेत

चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगूंटीवार, गिरीश महाजन, राधाकृष्ण् विखेपाटील, संजय कुटे, जयकुमार रावल, रविंद्र चव्हाण, बबनराव लोणीकर, राम शिंदे, प्रविण दरेकर, रवी राणा, निलेश राणे,

शिंदे गटाकडून ही नावे चर्चेत

संजय सिरसाठ, दादा भुसे, उदय सामंत, गुलाबराव पाटील, शंभुराजे देसाई , संदिपान भुमरे, दीपक केसरकर यांच्याशी फोनवरून संपर्क साधण्यात आल्याचे वृत्त आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.