राष्ट्रवादीच्या युवक प्रदेशाध्यक्षाची प्रधानमंत्र्यांना जाहिरनामाची कोपरखळी !

प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख यांची फेसबूक पोष्ट ; आम्ही भारतीय घरावर तिरंगा फडकवूच, पण जनतेची कामे करा,

0

रयतसाक्षी: स्वातंत्र्याच्या ७५ व्या रौप्यमोहत्सवी वर्षानिमीत्त हर घर तिरंगा अभियानाच्या माध्यमातून केंद्रातील भाजप सरकार महागाई, रोजगार यासह मुळ समस्यांपासून देशवासीयांचे लक्ष विचलीत करीत असल्याचा आरोप विरोधीपक्षांकडून केला जात आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख यांनी ‘आम्ही भारतीय लोक कर्तव्य पार पाडणार आहेत. घरावर झेंडा लावणे, झेंडा वंदनला उपस्थित राहणे, पण भारताचे पंतप्रधान म्हणून तुमची काही कर्तव्य पार पाडवेत’  असी फेसबुक पोष्ट  करत प्रधानमंत्री नरेंद्र मोदींना निवडणूकीतील जाहिरनामांची कोपरखळी मारली आहे.

 

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येणाऱ्या हर घर तिरंगा अभियानाची देशभरात जय्यत तयारी सुरू आहे. प्रशासकिय स्तरावरून अभियानाच्या यशस्वीतेसाठी जागृती करण्यात येत आहे. त्यातच स्वातंत्र्य दिनी घरावर तिरंगा फडकवण्याचा देशवासीयांमध्ये उत्साह आहे. विरोधीपक्षांकडूनही या अभियानाचे कौतुक होत असले तरी वाढती महागाई, बेरोजगारीसह देशवासीयांच्या मुळ समस्यांवरून केंद्रातील भाजप सरकारवर लक्ष विचलीत करीत असल्याचा अरोप करत हल्लाबोल करत आहेत.

प्रधानमंत्री मोदींच्या संकल्पनेतून राबविण्यात येणाऱ्या हर घर तिरंगा अभियानावरून राष्ट्रवादीचे युवकचे प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख यांनी फेसबुक पोष्ट  करत “आम्ही भारतीय लोक आमचे कर्तव्य पार पडणार आहोत. घरावर झेंडा लावणे, झेंडावंदन ला उपस्थित राहणे. मात्र भारताचे पंतप्रधान म्हणून तुमची काही कर्तव्य पार पाडवेत. वर्षला २ कोटी रोजगार देणार होतात, दत्तक ग्राम योजनेतून गावं विकसीत करणार होतात, स्मार्ट सिटी बनवणार होतात, गॅस चे दर कमी करणार होतात, परदेशातील काळेधन वापस आणणार होतात…  असो ही यादी फार मोठी आहे!

एक नागरिक म्हणून आमची अपेक्षा आहे की , तुम्ही ‘जनतेच्या कल्याणाचे तरी कर्तव्य पार पाडावेत ‘

सबंध जनतेवर फार फार उपकार होतील. इतकं केले  तरी … “ असी फेसबुक पोष्ट  करत प्रधानमंत्री मोदी यांना जाहिरनामाची आठवण करून देत कोपरखळी मारली आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.