अमृत मोहत्सावांतर्गत हर घर तिरंगा अभियानांसाठी नगरपंचायत सज्ज

शिरूरकासार नगरपंचायत कार्यालयात आढावा बैठक, ध्वज दक्षता बाबातत मार्गदर्शन

0

रयतसाक्षी : शिरूर कासार नगरपंचायत प्रशासनाच्या वतीने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्ग हर घर तिरंगा अभियानाच्या यशस्वीतेसाठी शिरूर कासार नगपंचायत कार्यालयाच्या सभागृहात बुधवारी दि. ११  शहरातील पत्रकार, सामाजीक कार्यकर्ते यांच्या प्रमुख उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात आली.

स्वातंत्र्याच्या आमृत महोत्सवा अंतर्गत केंद्र शासनाचे हर घर तिरंगा अभियान देशभरात मोठ्या उत्साहात राबविण्यात येत आहे. अभियानाच्या पूर्व तयारीसाठी प्रशासनस्तरावरून जागृती करण्यात येत आहे. शाळा, महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांच्या फेरीद्वारे गाव, शहराच्या गल्लीबोळातून जागृती करण्यात करण्यात आली. शहरात मंगळवारी दि. १० पोलिस निरिक्षक सिद्धार्थ माने यांच्यासह ठाण्याच्या सर्व स्टापच्या सहभागाने विद्यार्थ्यांनी हातात तिरंगा घेऊन मै देश का शिपाई हू ची घोषणाबाजी करत फेरी काढून नागरिकांना हर घर तिरंगा फडकविण्याचा संदेश दिला.

 

शहरातील जिल्हा परिषद हायस्कूल, कालिंका माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयासह खासगी इंग्रजी शाळेंच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. शहरात हर घर तिरंगा अभियानाच्या यशस्वीतेसाठी पूर्व तयारी म्हणून बुधवारी नगरपंचायत कार्यालयात समाजीक कार्यकर्ते, पत्रकार, आशा वर्कर, आंगणवाडी सेविका, महिला बचत गटांच्या सदस्या यांच्यासह शहरपातळीवर  सामाजकार्य करणाऱ्या सर्व क्षेत्रातील व्यक्तीच्या सहभागामध्ये आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील नागरिकांना नगरपंचायत कार्यालयात तिरंगा ध्वज उपलब्ध् करण्यात आला आहे.

अभियानात सहभागी होण्यासाठी योग्य मोल देवून नागरिकांना ध्वज खरेदी करावा यासह ध्वज फडकविण्या बाबत घ्यावयाची खबरदारी या विषयावर मुख्याधिकारी शिवाजी पालेपाड यांनी मार्गदर्शन केले. दरम्यान, दि१३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट कालावधीत प्रत्येक नागरिकांनी आपल्या घरावर तिरंगा ध्वज फडकवून देशाच्या आमृत महोत्सावाचे साक्षीदार होण्याचे आवाहन यावेळी नगराध्यक्षा प्रतिभा गाडेकर पाटील यांनी केले.

 

नगराध्यक्षा प्रतिभा रोहिदास गाडेकर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आयोजीत बैठकीस उपनगराध्यक्षा सौ. देसर्डा यांच्यासह  सर्व स्थाई समितीचे सभापती, नगरसेवक, पत्रकार, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, व्यापारी, नागरिकांसह कालिंका देवी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे मुख्यध्यापक अप्पासाहेब येवले, जिल्हा परिषद हायस्कुलचे मुख्यध्यापक श्री. शिंदे मुख्याधिकारी शिवाजी पालेपाड आदींची उपस्थिती होती.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.