वडवाडी दरोडा प्रकणातील आरोपींच्या मुसक्या आवळल्या

स्थानिक गुन्हे शाखेची दबंग कारवाई, बीड, उस्मणाबाद च्या ७० पोलिस कर्मचाऱ्यांचा सहभाग

0

रयतसाक्षी : नेकनूर पोलीस ठाण्याच्या हाद्दीतील वडवाडी (ता. जि. बीड) येथील बळीराजा विज्ञान केंद्रात दि. ४ ऑगस्ट रोजी मध्यरात्री १:३० ते २:४५ च्या दरम्यान अभिमान शाहूराव अवचार वय ३९ व्यवसाय कृषी संस्था व शेती रा. वडवाडी व त्यांची पत्नी सत्वशिला यांना जबर मारहाण करत शस्त्राचा धाक दाखवून सोने, रोख रकमेसह दहा लाख ६०००० हजार रूपये लुटून नेणाऱ्या दरोडेखोरांच्या टोळीतील दोन आरोपींच्या मुसक्या आवळण्यात बीड गुन्हे अन्वेशन शाखेच्या पोलिसांना गुरूवारी (दि.११) यश आले आहे. पोलिस अधिक्षक नंदकुमार ठाकूर यांच्या आदेशान्वये बीड, उस्माणाबाद पोलिसांच्या संयुक्त पथकाने ही दबंग कारवाई करत जिल्ह्यात गुन्हेगारीला थारा नसल्याचे संदेश दिला आहे.

 

वडवाडी शिवारातील बळीराजा कृषी विज्ञान केंद्रामध्ये संस्थेचे मालक अभिमान शाहूराव अवचार व त्यांची पत्नी त्याच्या राहत्या घरी इमरातीच्या तीसऱ्या मजल्यावर झोपेत असताना दि. ४ ऑगस्ट रोजी मध्यरात्री अज्ञात दरोडेखोरांनी घरात प्रवेश करत श्री अवचार पती- पत्नीस जबर मारहान करत त्यांचे हात पाय बांधून शस्त्राचा धाक दाखवत घरातील सोन्याचे दागिने व बळीराजा कृषी विज्ञान केंद्राच्या ऑफिस मधील रोख रक्कम असा एकून दहा लाख साठ हजार रूपाये लुटून नेले.

 

अभिमान अवचार यांच्या फिर्यादीवरून नेकनूर पोलिसात अज्ञात आरोपींच्या विरोधात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिस अधिक्षक नंदकुमार ठाकूर यांनी घटनेचे गांभिर्य राखून स्थानिक गुन्हे शाखेस तपासाचे आदेश दिले. पोलिस अधिक्षक श्री. ठाकूर यांच्या आदेशान्वये समांतर तपास चालू करण्यात आला. समांतर तापास चालू असतांना बीड व उस्मानाबाद जिल्ह्याच्या सरहद्दीतील गुन्हगार वस्त्या तपासण्यात आल्या.

 

तसेच नमुद गुन्हेगार वस्त्यांवर गुप्त बातमीदार नेमुन बातमीदारांकडून वेगवेगळ्या प्रकारे माहिती घेण्यात येत असतांना नेमलेल्या गुप्त बातमीदारामार्फत खात्रीलायक बातमी मिळाली की, फिर्यादी नामे अभिमान शाहूराव अवचार यांच्या कृषी सेवा केंद्रामध्ये काही वर्षपूर्वी एक इसम काम सोडून दूसरीकडे कामास गेला होता. परंतु तेथील आर्थीक व्यवहरा बद्दल त्याचे मनात लुटमार करून दरोडा घालून सदर ठिकाणची रक्कम लुटण्याचा विचार करून इतर साथीदारांसह सदर दरोडा घालण्याठी आरोपी नामे १) दत्ता रमेश शिंदे वय २७ वर्षे २) अकाश बापु काळे वय २२ वर्ष दोन्ही रा. कोठाळवाडी, महादेवनगर, ता. कळंब जि. उस्मनाबाद यांनी व त्याचे इतर साथीदार या सर्वांनी मिळून वडवाडी ता.जि. बीड येथील बळीराजा विज्ञान केंद्र येथे दि. ४ ऑगस्ट  रोजी पहाटेच्या दरम्यान सर्वांनी मिळून सशस्त्र दरोडा घातला व फिर्यादी व त्याचे पत्नीस जबर मारहाण करून त्यांचे हातपाय बांधून त्यांचे जवळील सोन्याचे दागिने व ऑफिस मधील रोख रक्कम बळजबरीने लुटून नेली.

 

मिळालेल्या माहितीच्या आधारे तसेच घटनास्थळी मिळालेल्या सीसीटीव्ही फटेज व आरोपीचे वर्णनावरून बीड स्था. गु.शा. चे पथक व उस्मणाबादचे स्था.गु. शा. यांच्या संयुक्त पथकाने दि. ११ ऑगस्ट रोजी मध्यरात्री टोकणी पेढी या ठिकाणी कोम्बींग ऑपरेशन राबवून काही संशयीत इसमांचे अभिलेख पडताळणी केली असता पोलिस स्टेशन बीड ग्रामीण गु र नं ३१८/२०१९  कलम ३९७, ३९५, ३२३, ५०६ भदंवि सह ४/२५ भारती हत्यार कायदा मधील निष्पन्न आरोपी  १) बलभिम बाबु काळे वय ३२ वर्षे २) अनिल उर्फ राहूल अंकुश शिंदे वय २५ वर्षे दोन्ही रा. कोठाळवाडी, महादेवनगर ता. कळंब, जि. उस्मानाबाद

 

हे पाहिजे रेकॉर्ड वरील आरोपी असल्याने त्यासंना बीड ग्रामीण पो.स्टे येथे हजर करण्यात आले. तसेच आरोपी १) दत्ता रमेश शिंदे वय २७ वर्षे २) आकाश बापु काळे वय २२ वर्षे दोन्ही रा. कोठाळवाडी, महादेवनगर, ता. कळंब जि. उस्माणाबाद यांना ताब्यात घेवून पो.स्टे नेकनूर गुरनं १८०/२०२२ कलम ३९५, ३९७ भादंविचे तपासकामी हजर केले असून पढील तपास नेकनूर पोलिस व स्थागुशा चे पथक करीत आहे . सबंधीत आरोपीकडून अशा प्रकारचे आणखी गुन्हे उघडकीस येण्यासाठी शक्याता आहे. वरील गुन्ह्यातील चोरलेल्या मुद्देमाल बाबत व त्यांनी केलेल्या आणखीन गुन्ह्याबाबत कसून तपास चालू आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.