…. अन शालेय विद्यार्थीणी झाली काही क्षणाची पोलिस अधिक्षक

पोलिस अधिक्षक नंदकुमार ठाकूर यांची सामाजीक बांधिलकी, राखी बांधण्यास आलेल्या मुलीस बसविले खुर्चीवर

0

बीड, रयतसाक्षी : पोलिस अधिक्षक नंदकुमार ठाकूर शिस्तप्रीय, कार्यतत्पर, कर्तव्यकठोर अशा कर्तबगारीची ओळख निर्माण होत असताना त्यांच्यातील मनमिळावू, संवेदनशीलतेच्या रूपाने सामाजीक बांधिलकीचा आगळा वेगळा संदेश दिला आहे. त्याचे झाले असे  बहीणभावाच्या नात्याची वीण घट्ट करणाऱ्या रक्षाबंधनानिमीत्त शुक्रवारी दि. १२ शालेय विद्यार्थीणी पोलिस अधिक्षक नंदकुमार ठाकूर यांना राखी बांधण्यासाठी आली असता पोलिस अधिक्षकामधील भाऊरायाने चक्क विद्यार्थी बहिणीला आपल्या खुर्चीवर बसवत काही क्षणाचे पोलिस अधिक्षक बनवून सामाजीक बांधीलकी जोपासली.

 

रक्षाबंधन एक पवित्र, सांस्कृतिक, भावनिक अगदी प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा सण आहे. बहिणीने भावाप्रति मंगलकामना करत राखी बांधावी अन् भावाने रक्षणाचे वचन तिला द्यावे , अशा गोड भावबंधात गुंफलेला हा सण शहरातील शालेय विद्यार्थीणीने पोलिस अधिक्षक नंदकुमार ठाकूर यांना राखी बांधत समाज रक्षणाचे वचन घेतले. राखी बांधण्यासाठी आलेल्या विद्यार्थीणीस पोलिस अधिक्षक श्री ठाकूर यांनीही बहिणीस समाज रक्षणाचे तर वचन दिलेच या शिवाय तिला स्वत: खुर्चीवर बसवून काही क्षणापुरते पोलिस अधिक्षक होण्याची ओवाळणीही दिली. पोलिस अधिक्षक श्री . ठाकून यांच्या सामाजीक बांधिलकीने राखी बांधण्यास आलेली विद्यार्थीणी भारावून गेली.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.