शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांचा अपघातात दूर्दैवी मृत्यू

मुंबई- पुणे द्रूतगती महामार्गावर पहाटे मेटे यांच्या गाडीला अपघात

0

रयतसाक्षी : शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचे अपघाती निधन झाले आहे. वयाच्या ५२  व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. एका दुर्दैवी अपघातात त्यांचा दुर्दैवी निधन झाले आहे. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर त्यांच्या गाडीचा आज पहाटे ५:३०  दरम्यान भाताण बोगद्याजवळ अपघात झाला होता. त्यानंतर त्यांना पनवेलच्या येथील एमजीएम रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.मिळालेल्या माहितीनुसार, मेटे यांच्या गाडीने अनोळखी वाहनाला धडक दिल्याची माहिती आहे. विनायक मेटे यांचा मुलगा गाडी चालवत होता. यामध्ये त्यांचा मुलगाही किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे.

 

विनायक मेटे आपला एक सहकारी आणि बॉडीगार्ड यांच्यासोबत मुंबईच्या दिशेने येत असताना हा अपघात झाला. आज दुपारी १२ : ०० दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत मराठा आरक्षणासंदर्भातील बैठकीसाठी ते मुंबईला निघाले होते. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा आमदार प्रवीण दरेकर एमजीएम रुग्णालयाच्या दिशेने रवाना झाले. 

 

अपघात कसा झाला?

विनायक मेटे यांच्या कारला एका मोठ्या ट्रकने बाजूने धडक दिल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. “आम्ही बीडवरून मुंबईकडे निघालो होतो. आम्हाला एका मोठ्या ट्रकने कट मारला. ट्रकच्या बंपरमध्ये कार अडकली आणि काही अंतरापर्यंत फरफटत गेली. आमचा अपघात पहाटे ५:०० वाजता झाला. पण मदत पोहोचण्यासाठी एक तास लागला. मी फोन केला तेव्हा कंट्रोल रूमवरच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने प्रतिसाद दिला नाही. जवळपास ६:०० वाजता रुग्णवाहिका आली”, अशी माहिती विनायक मेटेंचा अपघात झाला तेव्हा त्यांच्यासोबत असणारे सहकारी एकनाथ कदम यांनी दिली.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.