अपघात की घातपात ? ; विनायक मेटे यांच्या अपघाताची सरकारकडून चौकशी केली जाईल : मुख्यमंत्री

मेटे यांचे कुटुंबीय मुंबईकडे रवाना , सर्वतोपरी मदतीचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे अश्वासन

0

रयतसाक्षी : मुंबई- पुणे एक्स्प्रे वेवर पुण्याकउन मुंबईकडे येत असताना पळस्पे हद्दीत मडप बोगद्यापासून १६ किमी अंतरावर शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष व मराठा महासंघाचे नेते विनायक मेटे यांच्या गाडीला भीषण् अपघात झाला. या अपघातात मेटे यांचा जागीच मृत्यू झाला. सुरक्षा रक्षक, चालक हे दोघेही गंभीर जखती झाले आहेत. सकाळी मुख्यमंत्री एकनाथ् शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कळंबोली एमजीएम रूग्णलयात येऊन वैद्यकीय अधिकारी यांच्याशी चर्चा केली. या अपघाताची संपूर्ण् चौकशी होईल असे मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले.

 

आज रविवार सकाळी मराठा समाजाच्या बैठकीसाठी मेटे मुंबईकडे रवाना झाले होते. त्या बाबत मेटे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मोबाईलवर मेसेज पाठवल्याचे फडणवीस यांनी सांगीतले. मात्र सकाळी मेटे यांच्या वाहनाचा एक्स्प्रे वेवर अपघात झाल्याची माहिती मिळाली. पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, महेश बालदी यांना एमजीएम रूग्णलयात पाठवले. मात्र मेटे यांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती हाती पडली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ् शिंदे यांनी मराठा समाजासाठी लढणारा नेता हरपला अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. या अपघाताची चौशी केली जाणार असल्याचेही स्पष्ट केले. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेले दहा वर्षे एकत्र असल्याचे सांगितले.

 

मराठा समाजाचे ते नेते होते. आरक्षणबाबत त्यांनी मुद्दे उपस्थित केले. त्यांच्या कुटुंबातील सदस्य मुंबईकडे निघाले असून, त्यांना जी काही मदत, व्यवस्था लागेल ती करण्यात येईल असे सांगितले. एमजीएम रूग्णलयात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मराठा समाजाचे नेते आबा पाटील देखील रूग्णालयात आले. त्यांनी ही हा अपघात आहे की घातपात असा प्रश्न उपस्थित केला आहे.

 

सरकारने या प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी मागणी केली. या अपघातात समाजासाठी लढणारा नेता गमवल्याचे त्यांनी म्हटले. आता तरी सरकारने मराठा समाजाला आरक्षण् देऊन मेटेंना श्रध्दांजली अर्पण करावी असे म्हटले. पाटील यांनी यावेळी अपघात झाल्यानंतर अर्धा तास रूग्णवाहिका घटनास्थळी आली नसल्याची माहिती दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.