पोटोद्या जवळ स्वीप्ट- कंटेनरचा भीषण अपघात सहा ठार

बीड- मांजरसुंबा मार्गावर बामदळे वस्ती जवळील घटना

0

रयतसाक्षी : बीड जिल्ह्याचे नेते विनायक मेटे यांच्या अपघाताची बातमी ताजी असतनाच, बीडच्या पोटोदा- मांजरसुंबा रोडवरील पाटोद्या जवळ भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे . पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पाटोदा- मांजरसुंबा रोडवरील पाटोद्या जवळ बामदळे वस्ती येथे स्विप्ट डिझायर कार- आयशर टेम्पोचा भीषण् अपघा झाला. या  अपघातात तब्बल सहा जण जागीच ठार झाले. घटनास्थळी पाटोदा पोलीस व सामाजीक कार्यकर्ते दाखल होऊन अपघातातील व्यक्तींना बाहेर काढण्यात आले आहे.

 

जीवाचीवाडी गावावर शोककळा

जीवाचीवाडी येथील रहिवासी रामराव कुटे हे सलग चार-पाच दिवस सुट्या असल्याने पुणे येथे आपल्या मुलीला आणण्यासाठी गेले होते. संपुर्ण् कुटुंब गाडीतून परतत असताना हा अपघात झाला यामध्ये कुटे कुटूंबातील दोन मुले, एक महिला, एक पुरूष आणि एका मुलीचा समावेश आहे तर अन्य एक मुलीचा अपघातात मृत्यू झाला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.