पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांना लवकरच न्याय

विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांचे आश्वासन बीड जिल्हा अध्यक्षा योगिता शेळके यांच्या प्रयत्नाला यश

0

आष्टी, रयतसाक्षी :पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांच्या कामाचा प्रश्न गेल्या २० वर्षापासून प्रलंबित असून त्यावर ती आजपर्यंत अनेक जीआर काढण्यात आले मात्र अंशकालीन कर्मचाऱ्यांचा कामाचा प्रश्न सोडविण्यात आला नाही,अनेक वेगवेगळे आंदोलने, मोर्चे काढण्यात आले मात्र संबंधित प्रशासनाला जाग आली नाही . त्यामुळे २९ नोव्हेंबर २०२१ रोजी बीड उपजिल्हाधिकारी यांना अंशकालीन च्या कामासंदर्भात निवेदन देण्यात आले.

त्यानुसार मंगळवारी (दि. ७ ) औरंगाबाद विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांना अंशकालीन कर्मचाऱ्यांच्या कामाचा प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडवावा, मराठवाड्यात अद्याप पर्यंत जिल्हाधिकारी यांनी अंमलबजावणी केली नसून लवकरात लवकर अंमलबजावणी करण्यात यावी,

आपल्या स्तरावरून संबंधितांना कडक सूचना देऊन आदेशीत करण्यात यावे अन्यथा पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांना तारीख देऊन आंदोलनाची परवानगी देण्यात यावी असे निवेदन महिला जिल्हाध्यक्षा योगिता शेळके, गणेश भोसले,निसार अहेमद,प्रकाश फुके,राजू देवरे, कैलास मोगले,मधुकर बेंडाळे आदी कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत देण्‍यात आले.याप्रसंगी आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी निवेदन दिले .

याशिवाय अंशकालीन कर्मचाऱ्यांशी चर्चा करून गेल्या २० वर्षापासूनचा कामाचा प्रलंबित प्रश्न, जीआर ची लवकरात लवकर अंमलबजावणी करून सोडवला जाईल असे ठाम आश्वासन आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी दिले . छत्रपती पदवीधर अंशकालीन महिला अध्यक्षा योगिता शेळके यांच्या पाठ पुरावा व प्रयत्नांना यश आल्याने सर्व पदवीधर अंशकालीन कर्मचारी बांधवांनी योगिता शेळके यांचे आभार मानले

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.