15 सप्टेंबरपर्यंत राज्य मंत्रिमंडळाचा दुसरा विस्तार: , मुख्यमंत्री शिंदेंनी शब्द दिला आहे. आ. बच्चू कडू यांचा दावा; म्हणाले, मी नाराज नाही.

व्यक्तिगत हितासाठी नाराजी नाही.

0

15 सप्टेंबरपर्यंत मंत्रिमंडळाचा दुसऱ्या टप्प्यातील विस्तार होईल. मंत्रिमंडळात मला स्थान देण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शब्द दिला आहे, असे आज प्रहार संघटनेचे नेते व अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी सांगितले.

मंत्रिमंडळ विस्ताराच्या पहिल्या टप्प्यात बच्चू कडू यांना स्थान मिळाले नाही. त्यामुळे त्यांनी नाराजीही व्यक्त केली होती. यावर बच्चू कडू म्हणाले, आमचे काही महत्त्वपूर्ण मुद्दे असून त्यावर लढाई सुरु राहिल. व्यक्तिगत हितासाठी मी कधीही नाराज होणार नाही.

व्यक्तिगत हितासाठी नाराजी नाही

मंत्रिमंडळ विस्तारानंतर झालेल्या शपथविधीला बच्चू कडू गैरहजर होते. त्यामुळे ते नाराज असल्याची चर्चा होती. यावर बच्चू कडू म्हणाले, मी माझ्या काही कामानिमित्त बाहेर गेलो होतो. त्यामुळे येवू शकलो नाही. व्यक्तिगत हितासाठी मी कधीही नाराज होणार नाही. पुढील मंत्रिमंडळ विस्तारात तुमच्या नावाचा विचार केला जाईल, असा शब्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मला दिला आहे. त्यामुळे नाराजीचा प्रश्न येत नाही.

आदित्य ठाकरेंवर टीका

शिवसेना नेते आदित्य ठाकरे बंडखोरांवर सातत्याने टीका करत आहे. जे पक्षाशी एकनिष्ठ राहू शकले नाही ते जनतेशी काय निष्ठा ठेवणार. यावर पक्षनिष्ठा नाही तर जनतेशी निष्ठा महत्त्वाची असते. सामान्य नागरिक, जनतेवर निष्ठा असली पाहिजे, असा टोला बच्चू कडू यांनी लगावला.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.