नगरपंचायतीच्या सांडपाणी व्यवस्थापनाचे रस्त्यावरच वाजले की बारा

शिरूर शहरातील चित्र; बाजारतळावरील दोन्ही रस्त्यावरून वाहतेय सांडपाणी : नागरिकांचे आरोग्य धोक्यात !

0

रयतसाक्षी: शिरूर कासार शहरातील स्वच्छते अभावी तुंबलेल्या गटारातील सांडपाणी रसत्यावरून वाहील्याचे शहरवासी साक्षी आहेत. शहरासाठी वर्दळीचा ठरलेल्या पोलिस ठाण्यापासून बाजारतळावर जाणाऱ्या दोन्ही रस्त्यावरून कायम सांडपाणी वाहत आहे. रहदारी करणाऱ्या नागरिकांसह व्यवसायिक मेटाकूटीला आले आहेत. दिवसरात्र रस्त्यावरून वाहनाऱ्या दूर्गंधीयुक्त सांडपाण्यामुळे नगरपंचायत प्रशासनाच्या साडपाण्याचे रस्त्यावरच बारा वाजल्याच्या संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

शहरातील मुख्यरस्त्याच्या बाजूला भुमिगत गटारा असल्यातरी अनेकवेळा सफाई अभावी तुंबलेल्या गटारातील दूर्गंधीयुक्त सांडपाणी रस्त्यावरून वाहते. पोलिस ठाण्यापासून बाजारतळावर जाणाऱ्या दोन्ही रस्त्याच्या कडेला गटारांचे अस्तीत्वच शोधून सापडत नाही. सांडपाणी वाहून नेणाऱ्या गटारांच अस्तीत्वच धोक्यात आल्याने या दोन्ही रस्त्यावर कायम सांडपाणी वाहत आहे.

दरम्यान, छत्रपती संभाजीराजे चौकापासून रस्त्यावर वाहणारे सांडपाणी थेट बाजारतळातील रस्त्यावरून सिंदफणा नदीपात्रात समाविष्ठ होत आहे. सिध्देश्वर चौकापासून रस्त्यावर कायम वाहणारे सांडपाणी सायकल मार्ट व्यवसायिकांच्या दुकाना समोरून वाहत सिंदफणा नदीपात्रात समाविष्ठ होते. शहराच्या वर्दळीसाठी दोन्ही रस्ते महत्वाचे असले तरी वाहन चालकांसह पादचाऱ्यांना मात्र नाक दाबून रस्त्यावरून ये- जा करावी लागले.

 

त्यातच खड्यांत साचलेल्या सांडपाण्यांच्या डबक्यातून वाहन निघून गेल्यास त्याद्वारे उडणारे सांडपाण्याचे फवारे नागरिकांना झेलावे लागत आहेत. प्रत्यक्षात अनेकवेळा नगरपंचायतीचे पदाधिकारी याच रस्त्यावरून ये- करत असले तरी सांडपाणी व्यवस्थापनाच्या उपाय योजना नगरपंचायत प्रशासनाला सुचत नसल्याचे अश्चर्य आहे. रस्त्याच्या कडेला असलेल्या व्यवसायिक नागरिकांनी नगपंचायतीकडे वारंवार तोंडी तक्रारी करून देखील नगरपंचायत प्रशासनाला जाग येत नसल्याचे भावना व्यवसायिक नागरिकांनी बोलून दाखवल्या.

 

सांडपाण्याच्या प्रवाहमुळे रस्त्यावर खड्डे

नाली अभावी रस्त्यावरून कायम वाहनाऱ्या सांडपाण्यामुळे सीसीसी रस्त्यावर खड्डे निर्माण झाले आहेत. मागील तीन वर्षापूर्वी बनवलेल्या सीसीसी रस्त्यांचे अस्तीत्व खड्यात हरवले आहे. या शिवाय रस्त्यावरील काँक्रेट खरडून गेल्याने चिखलातून दुर्गंधीयुक्त सांडपाण्यातूनच नारिकांना मार्ग शोधावा लागत आहे.

 

नागरिकांचे आरोग्य धोक्यात

दोन्ही रस्त्यावरून कायम वाहनाऱ्या सांडपाण्याच्या डबक्यात विविध प्रजातींच्या डासांचा प्रदूर्भाव वाढल्याने परिसरातील नागरिकांना हिव ,ताप यासह डेंग्यू सदृष्य, मलेरीया सारख्या आजारांना तोंड द्यावी लागत आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.