प्रसिद्ध गायक महादेव महाराज घुंगरड यांना मातृ-पितृ शोक

मातृ शोकात बुडालेल्या घुंगरड परिवावर अवघ्या २४ तासानंतर दुसर्या दिवशी त्यांचे वडील बापुराव आबाजी घुंगरड यांचे ८ सप्टेंबर रोजी वृद्धापकाळाने निधन झाले

0

तिंतरवणी, रयतसाक्षी: निंबगाव (मा) येथिल प्रसिद्ध गायक महादेव महाराज यांच्या मातोश्रींचे दिनांक २ सप्टेंबर रोजी दीर्घ आजाराने यांचे निधन झाले. मातृ शोकात बुडालेल्या घुंगरड परिवावर अवघ्या काही दिवसांत  तासानंतर दुसर्या दिवशी त्यांचे वडील बापुराव आबाजी घुंगरड यांचे ८ सप्टेंबर रोजी वृद्धापकाळाने निधन झाले.त्यांच्या कुटुंबियांवर खुप दुःखद प्रसंग ओढवला.

 

त्यांना या दुखातुन सावरण्याची ईश्वर शक्ती देवो हिच ईश्वरचरणी प्रार्थना.व त्या मातापित्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.त्यांचा दशक्रिया विधी दिनांक 11-09-2022 रोजी निमगाव मायंबा येथे होणार आहे.त्या निमित्ताने श्री ह.भ.प.जनार्धन महाराज गुरु निगमनांद महाराज, ह.भ.प.रामेश्र्वर महाराज शास्त्री ब्रम्हनाथ संस्थान येळंब, ह.भ.प.उद्धव महाराज शास्त्री माऊली संस्थान शास्त्रीनगर, ह.भ.प.नामदेव महाराज बोरीपिंपळगाव ह.भ.प.प्रल्हाद महाराज विघ्ने दत्त संस्थान बावी, ह.भ.प.ढीसले महाराज माऊली संस्थान दगडवाडी, ह.भ.प.भीष्मप्रसाद महाराज, ह.भ.प. मारुती महाराज झिर्पे

 

, ह.भ.प.नवनाथ महाराज मच्छिंद्रनाथ संस्थान भालगाव, ह.भ. प.सुरेशानंद महाराज शृंगऋषी गड शृंगारवाडी, ह.भ.प. विवेकानंद शास्त्री सिद्धेश्वर संस्थान शिरूर कासार. यांचे प्रवचन होणार आहे. अंकुश बापुराव घुंगरड, महादेव बापुराव घुंगरड (गायक), तिर्थराज बापुराव घुंगरड (चीफ अकाऊंट), राजेश बापुराव घुंगरड (शिवसंग्राम नेते) यांच्यासह घुंगरड परिवारास दु:खातून सावरण्याची ईश्वर शक्ती देवो घुंगरे परिवाराच्या दु:खात रयतसाक्षी परिवार सहभागी आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.