छाणणीत कोणत्या नगरपंचायतीत किती अर्ज बाद

आष्टी विधानसभाक्षेत्रातील तीनही नगरपंचायतीची प्रक्रीया

0

रयतसाक्षी: आष्टी, पाटोदा , शिरूर कासार नगरपंचायतीच्या सार्वत्रीक निवडणूकांठी लाख नामनिर्देशनपत्रांची बुधवारी (दि.८) छाणणी करण्याचा आली . मा . उच्च न्यायालयाने ओबीसीच्या २७ टक्क्यांपेक्षा अधिकच्या आरक्षणाला स्थगिती निर्णय दिल्याने निवडणूक आयोगाने ओबीसी घ्या राखीव जागेवरील निवडणूक स्थगिती केली. त्यामुळे मंगळवारी दुपारनंतर ओबीसी साठीचे नामनिर्देशनपत्र स्वीकारण्यास प्रशासनाकडून स्थगित करण्यात आले होते . मात्र दुपारपर्यंत ओबीसी‌ राखीव जागेसाठी अर्ज सादर करण्यात आले होते.

निवडणूक विभागाने जाहिर कार्यक्रमात नुसार आष्टी, पाटोदा तहसिल कार्यालयामध्ये आज आज छाणणी प्रक्रीया करण्यात आली. आष्टी नगरपंचायतीच्या एकून १७ प्रभागासाठी १५७ अर्ज दाखल करण्यात आले होते. यामध्ये छाननीत तब्बल ७३ अर्ज बाद झाले. त्यामुळे आता १३ प्रभागांसाठी ८४ उमेदवार राहिले आहेत.

शिरूर कासार नगरपंचायतीच्या १७ प्रभागासाठी १२२ अर्ज दाखल करण्यात आले होते छाणणीतून ५५ अर्ज बाद झाले तर आता एकूण १३‌ प्रभागासाठी ६७ अर्ज पात्र ठरले आहेत. पाटोदा नगरपंचायतीच्या १७ प्रभागासाठी १७९ अर्ज दाखल करण्यात आले होते छाणणी दरम्यान ५८ अर्ज बाद झाले तर एकूण १३‌प्रभागाठी १२१ अर्ज वैध ठरविण्यात आले.

दरम्यान , उमेदवारी अर्जांचा विविध पक्षांनी‌ अधिकृत बी‌फाॅर्म जोडून‌दिले असले तरी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिनी‌(दि.१३) सोमवारी सायंकाळपर्यंत लढतीचे चित्र‌स्पष्ठ होणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.