प्रबोधन’ नियतकालिकाचा प्रवास उलगडणार

दिलखुलास' कार्यक्रमात मराठी भाषा व उद्योग मंत्री सुभाष देसाई यांची मुलाखत

0

मुंबई, रयतसाक्षी: माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात मराठी भाषा व उद्योग मंत्री सुभाष देसाई यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे.

ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या अॅपवर शुक्रवार दि.१० आणि शनिवार दि.११ डिसेंबर २०२१ रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होईल. ज्येष्ठ पत्रकार व निवेदक सचिन परब यांनी ही मुलाखत घेतली आहे.

प्रबोधन नियतकालिकाला यंदा १०० वर्षे पूर्ण झाली आहेत. या नियतकालिकाची आतापर्यंतची वाटचाल तसेच या नियतकालिकाचे संस्थापक – संपादक दिवंगत प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांचे सामाजिक व साहित्यिक कार्य या विषयावर ही मुलाखत घेण्यात आली आहे.

प्रबोधनमधील प्रबोधनकारांचे लेख, अप्रकाशित साहित्य जनतेसमोर आणण्याची संकल्पना, हुंडाबंदीसाठी केलेले प्रयत्न, प्रबोधन नियतकालिकाची शताब्दी साजरी करताना राबविण्यात येणारे विविध उपक्रम आदी विषयांची सविस्तर माहिती मराठी भाषा मंत्री श्री.देसाई यांनी ‘दिलखुलास’ या कार्यक्रमातून दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.