खासदार‌ डाॅ. प्रितम मुंडे यांनी घेतली रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष शर्मा यांची भेट

नगर-बीड-परळी रेल्वे मार्गाच्या प्रश्नासह घाटनांदुर रेल्वेस्थानकावर जलद गती गाड्यांना थांबा देण्याची मागणी

0

रयतसाक्षी : परळी तालुक्यातील घाटनांदूर रेल्वे स्थानकावर जलद गती गाड्यांना थांबा देण्यात यावा या मागणीसाठी खासदार डॉ.प्रितमताई मुंडे यांनी रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष सुनीत शर्मा यांची दिल्ली येथे भेट घेतली.तसेच याभेटीत त्यांनी नगर-बीड-परळी रेल्वे प्रकल्पाविषयी चर्चा करून जिल्ह्यातील रेल्वेच्या समस्या सोडवण्याची मागणी केली.

घाटनांदूर रेल्वेस्थानक हे प्रवासी आणि व्यापारी दृष्ट्या अतिशय सोयीचे असल्याने या मार्गाहून जाणाऱ्या जलदगती गाड्यांना थांबा मिळणे आवश्यक आहे.जलद रेल्वे गाड्यांना घाटनांदूर येथे थांबा मिळाला तर या भागातील प्रवासी नागरीक आणि व्यावसायिक कामांनिमित्त हैद्राबाद येथे जाणाऱ्या व्यापाऱ्यांची मोठी सोय होणार असल्याचे खा.प्रितमताई मुंडे म्हणाल्या.

नांदेड-बंगलोर हंपी एक्सप्रेस, हैदराबाद-औरंगाबाद एक्सप्रेस, नांदेड-पनवेल एक्सप्रेस या रेल्वे गाड्यांना थांबा द्यावा या मागणीचे निवेदन खासदार प्रितम मुंडे यांनी सुनीत शर्मा यांना दिले.

घाटनांदूर रेल्वे स्थानकावर या जलद गाड्यांना थांबा मिळाला तर प्रवासी,व्यापाऱ्यांसह दक्षिण भारतात देवदर्शन आणि पर्यटनासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांची सोय होणार असल्याने खा.प्रितमताई मुंडे यांनी केलेल्या मागणीसाठी प्रवासी नागरीकांमधून त्यांचे आभार व्यक्त केले जात आहेत.

रेल्वेपूलांच्या रस्त्यांसंदर्भात सूचना देण्याची मागणी

जिल्ह्यातील रेल्वेमार्गावर असलेले पूल आणि त्याखालून जाणाऱ्या रस्तेबांधणीच्या कामात अनेक तांत्रिक त्रुटी आहेत,या त्रुटींमुळे स्थानिक नागरीकांना विविध समस्यांचा सामना करावा लागतो आहे.यासंदर्भात आम्ही स्थानिक पातळीवर संबंधिताना सूचना केल्या आहेत.

रेल्वे विभागाच्या वरिष्ठ पातळीहुन देखील याविषयी सूचना देण्यात याव्यात,जेणेकरून नागरीकांना उद्भवनाऱ्या अडचणींची गांभीर्याने दखल घेतली जाईल व समस्यांचे निराकरण होईल असेही खा.प्रितमताई मुंडे यांनी रेल्वेबोर्डाच्या अध्यक्षांना सूचित केले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.