नगरपंचायतीच्या लढतींची उत्सुकता

प्रभाग निहाय उमेदवारीची चर्चा ; तर्क-वितरकांना उधान

0

शिरूर (कसार),रयतसाक्षी : नगरपंचायतीच्या सर्वत्रीक निवडणूकीच्या ओबीसी राखीव जागेवरील निवडणूकीला आयोगाने स्थगिती दिल्याने उत्साहात‌ विर्जन पडले. पण उर्वरित १३ जागांसाठी मतदान प्रक्रीया होणार असल्याने आष्टी,पाटोदा, शिरूर मध्ये प्रभाग निहाय उमेदवारीवर गप्पांचे फड रंगु लागले‌ आहेत.
नगरपंचायत निवडणूच्या सार्वत्रीक निवडणूकांसाठी उमेदवारी अर्जाच्या छाणणी नंतर नामनिर्देशनपत्र मागे घेण्याच्या अंतिम दिवशीच लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहेत आहेत . भाजपचे स्थानिक स्वराज्य संस्थेचे आमदार सुरेश धस यांच्या ताब्यातील नगरपंचायतीची सत्ता काबीज करण्यासाठी राष्ट्रवादीचे युवा प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख यांनी तुल्यबबळाचे उमेदवार देऊन चांगलीच तयारी केली आहे .

बहूतांश प्रभागातील उमेदवा-या सध्या चर्चेचा विषय बनल्या असल्या तरी शिवसेनेचे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनीही तोलाचे उमेदवार रिंगणात उतरवून निवडणूक आखाड्यात बान सोडला आहे. त्यामुळे तिरंगी लढतीचे चित्र स्पष्ट दिसत असले तरी शिरूरकर राष्ट्रवादीचा गजर करणार? , भाजपाच्या कमळाचा गंध घेणार का? शिवसेनेचा धनुष्य पेलणार ? हे पाहणे औत्सुक्याचे ‌ठरणार आहे .

वंचित बहूजन आघाडीची एंट्री
नगरपंचायतत निवडणूकीच्या लढतीचे चित्र स्पष्ट होत असले तरी
वंचितबहूजन आघाडीने मागास प्रवर्गासाठी राखीव प्रभाग सोडून सर्वसाधारण जागेवरून उमेदवार रिंगणात उतरवला आहे. त्यामुळे कमी प्रभागात तिरंगी तर काही प्रभागात चौरंगी लढतीचे चित्र सध्यातरी दिसून येत आहे .

अपक्षांच्य मनधरण्या बैठका ,व्यूव्हरचना
शहरातील प्रभागनिहाय उमेदवारांची संख्या पाहता प्रभाग क्रमांक १५ मध्ये सर्वाधिक ९ उमेदवारी अर्ज आहेत त्या खालोखाल प्रभाग क्रमांक ६ मध्ये ८, १४ मध्ये ७ तर ३ व १७ मध्ये प्रत्येकी ६ उमेदवारी अर्ज दाखल आहेत. त्याच बरोबर प्रभाग क्रमांक १०, १३ आणि १६ प्रभागात सर्वात कमी प्रत्येकी ३ उमेदवारी अर्ज दाखल आहेत . त्यामुळे ज्या प्रभागात अक्षांची‌संख्या अधिक आहे त्या प्रभागाती‌ अपक्ष उमेदवारांच्या मनधरण्या करण्यासाठी बैठकांतुन व्यूव्हरचना आखल्या जात आहेत .

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.