गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाडांचे शिवसेनेवर आरोप

राष्ट्रवादी-शिवसेनेत वाक् युद्धाची शक्यता ; काय म्हणाले‌ जितेंद्र आव्हाड

0

रयतसाक्षी: महाविकास आघाडीमध्ये मांडीला मांडी लावून बसलेले राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात सध्या जुंपण्याची चिन्हं आहे. यामागील कारण म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी शिवसेनेला जाहीर इशारा दिला आहे.

मोठा भाऊ म्हणून आदर करु, मात्र बोलायचे एक आणि करायचे एक हे खपवून घेतलं जाणार नाही असं जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत. यावेळी त्यांनी भाजपा आम्हाला फार लांब नाही असा सूचक इशाराही दिला. ते नवी मुंबईत आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात बोलत होते.

नवी मुंबई महापालिका निवडणूक लक्षात घेता राष्ट्रवादी काँग्रेसने आतापासून कंबर कसली आहे. दरम्यान ऐरोली येथे घेण्यात आलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात जितेंद्र आव्हाड यांनी मार्गदर्शन केलं.

यावेळी त्यांनी २०२४ मध्ये पुन्हा एकदा महाविकास आघाडीचं सरकार येईल असा विश्वास व्यक्त केला. तसंच उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री होतील असं शरद पवारांनी खासगीत सांगितलं असल्याचा खुलासाही केली. मात्र यावेळी त्यांनी शिवसेना आणि अप्रत्यक्षपणे एकनाथ शिंदे यांच्या कार्यपद्धतीवर टीका केली.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.