सीडीएस बिपीन रावत यांना आष्टी येथे श्रद्धांजली

भारतीय सेना दलाचे प्रमुख जनरल बिपिन रावत यांचे निधन झाले त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो.त्रिदल सैनिक संघटनेच्या वतीने आष्टी येथे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण

0

आष्टी, रयतसाक्षी : भारतीय सेना दलाचे प्रमुख जनरल बिपिन रावत यांचे तामिळनाडू मध्ये हेलिकॉप्टर अपघातात दुःखद निधन झाले. त्याचबरोबर त्यांच्यासमवेत पत्नी मधुलिका रावत व सैनिक अधिकारी,कर्मचारी यांचेही या अपघातात दुःखद निधन झाले.
दिवंगत जनरल रावत व त्यांच्या समवेत शाहिद झालेल्या सर्व साथीदाराच्या आत्म्यास चिरशांती लाभो यासाठी त्रिदल सैनिक सेवा संघटना बीड जिल्हा आणि त्रिदल सैनिक संघटना आष्टी तालुका यांच्या वतीने आष्टी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात श्रद्धांजली अर्पण करण्यात आली .

यावेळी सैनिक संघटनेचे बीड जिल्हा उपाध्यक्ष विकास म्हस्के,आष्टी तालुका अध्यक्ष अंकुश खोटे,सचिव महादेव खेडकर,भगत साहेब,जगदाळे साहेब,वाल्हेकर मेजर,नेटके मेजर,पाखरे मेजर,पांढरे मेजर,गुंजाळ मेजर,शिंदे मेजर, खाडे मेजर,झगडे मेजर,हांगे मेजर,गायकवाड मेजर,धोंडे मेजर तसेच यावेळी पत्रकार अण्णासाहेब साबळे आणि इतर माजी सैनिक, व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.