शिरूरमध्ये नगरपंचायत प्रशासनाची निर्जळी !

दिड महिन्यापासून पाणीपुरवठा खंडीत ; नागरिकांचे पाण्यासाठी हाल !

0

शिरूर कासार, रयतसाक्षी : उशा-पायथ्याच्या सिंचनस्रोतांमध्ये मुबलक पाणीसाठा असताना तब्बल दिड महिण्यापासून तांत्रीक कारणाच्या आडून शिरूर शहराचा पाणीपुरवठा खंडीत आहे. एकीकडे निवडणूकीची धामधुम तर दूसरीकडे शहरवासीयांचे पाण्यासाठी हाल असा विरोधाभास नागरिक अनुभवत आहेत .

शहराच्या सुरळीत पाणीपुरवठ्यासाठी उथळा- महाजल, सिंदफणा -पुरक पाणीपुरवठा व सिंदफणा नदीवरून जूनी पाणी पुरवठा योजना कार्यान्वीत आहे . लोकसंख्येच्या तुलनेत मुबलक पाणीपुरवठ्यासाठी सक्षम असलेल्या योजना‌केवळ नगरपंचायत प्रशासनाच्या ढिसाळ‌ नियोजनामुळे अकार्यक्षम झाल्या आहेत .

महाजल योजनेकडे बोट दाखवत प्रशासनाचे कर्मचारी वेळ मारून नेत असले तरी तब्बल पंधरा दिवसांतून केवळ २५ मिनिटे शहराच्या गल्ली बोळांना टप्यात टप्प्याने पाणी पुरवठा करण्यात‌ येतो . प्रत्यक्षात तीन योजना‌पैकी केवळ एका योजनेचा उच्च दाबाने पाणीपुरवठा केला तरी शहराला सुरळीत आणि मुबलक पाणीपुरवठा होऊ शकतो.

पण केवळ विजपुरवठा सुरळीत नाही, जलवाहिनीला गळती , इलेक्ट्रीकल पंप‌जळाला जळाला दूरूस्तीसाठी पुणे येथे न्यावे लागते असे एक ना अनेक प्रश्नांचे काहूर‌ नगरपंचायत प्रशासनाकडून माजवले जाते.

महाजल योजनेची इलेक्ट्रीकल मोटार नादूरूस्त असल्याचे सांगण्यात येत असले‌तरी सिंदफणा मध्यम प्रकल्पातून राबवलेल्या पुरक पाणी पुरवठा योजनेचा इलेक्ट्रीकल पंप, सिंदफणा नदीवरील जुन्या पाणीपुरवठा योजनेचा इलेक्ट्रीकल पंपाचे काय? त्यासाठी जुना जलकुंभ डिस्मेंटल केल्याचे कारण प्रशासनाचे ठरलेलंच .

नियोजनाची वनवा आणि जबाबदार यंत्रणेतील समन्वयाचा‌ अभावामुळे मागील काळात प्रशासकाकडून शहराला दूषीत, तोकडा पाणीपुरवठा झाला . केवळ दूरूस्ती खर्चाचे कारण पुढे करत तांत्रीक कारणांमुळे शहराचा दिड महिन्यापासून पाणि पुरवठा खंडीत ठेवणे प्रशासकाच्या नाकर्तेपणाचे शाश्वत उदाहरण आहे असं म्हणणं वावगं ठरणार नाही .

प्रशासन निवडणूक कामातव्यस्त आहे. पाणी प्रश्नांचा विसर पडलेल्या प्रशासकांना जाब विचारणारे प्रतिष्ठीत मतांच्या गोळाबेरीज मग्न आहेत. अशा अवस्थेत शिरूर करांनी कोणाकडे मागावी हाच मोठा प्रश्न आहे .

आण्णा प्रशासकाचे कान पिळा

सामान्य नागरिकांच्या कुठल्याही समस्या तडीस लावणारे भाजपाचे आमदार सुरेश धस यांच्याकडून शिरूर करांनी मोठ्या अपेक्षा ठेवल्या आहेत . दिड महिन्यापासून शहराचा पाणि पुरवठा खंडीत आहे. उद्या -पायथ्यांच्या सिंचनस्रोतामध्ये मुबलक पाणिसाठा असताना शहरात निर्जळी करणार्या प्रशासकाचे सुरेश आण्णा कान पिळा अशी सर्वसामान्यातून मागणी होत‌ आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.