कृषी पर्यवेक्षक दिलीप तिडके सेवानिवृत्त

कृषी विभागाकडून सन्मान; भावी आयुष्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव

0

तिंतरवणी, रयतसाक्षी: शिरूर कासार तालुका कृषी विभागातील कृषी पर्यवेक्षक दिलीप तिडके शुक्रवार (दि.१०) सेवानिवृत झाले.

कर्तव्यकठोर स्मीतभाषी आणि शेतकर्यांचा समस्यांना जाणून घेणारं व्यक्तीमहत्व म्हणून श्री. तिडके यांची सर्वसमावेशक ओळख. हजरजबाबी आणि मेहनतीच्या जोरावर त्यांनी सेवा काळात स्टापसह सर्वसामान्यांची मने जिंकली .
शुक्रवारी (दि.१०) वयोमानाने त्यांनी आपल्या सेवेचा कार्यकाळ पूर्ण केल्याने तालुका कृषी कार्यालयात निरोप समारंभ कार्यक्रमाचे आयोजनात करण्यात आले होते .

प्रभारी कृषी अधिकारी जाधव,प्रभारी मंडलाधिकारी संजय फरताडे यांच्या हस्ते श्री. तिडके यांचा सन्मान व गौरव करण्यात आला. यावेळी त्यांच्या सेवा काळातील आठवणींना उजाळा देत उपस्थितांनी मनोगत व्यक्त केले भावी आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी लिंबाजी काटकर,एम.के.शेख, श्री. माळी, श्री.पवळ,श्री.जाधव,श्री.सोनवणे,श्री.जोगदंड, श्री.चाकणे,श्री.कामटे,श्री.गायकवाड आदी कर्मचा-यांसह शेतकरी हितचिंतक उपस्थित होते .

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.