शेतकऱ्यांच्या हितासाठी जय महेश वाचवणे गरजेचे– नारायण होके

शेतकरी हितासाठी काँग्रेस शेतकर्यांसोबत; जयमहेश सर्वांगिण हिताचा

0

माजलगाव, रयतसाक्षी : तालुक्यातीच्या पंचक्रोशीत आजचा एन एस. एल. साखर कारखाना म्हणजेच कालचा जय महेश साखर कारखाना . काॅंग्रेसपक्ष नेहमी शेत-यांच्या पाठीशी राहिला आहे, शेतकरी हितासाठी जय महेश वाचला पाहिजे असे प्रतिपादन तालुकाध्यक्ष नारायण होके यांनी येथे केले

तालुक्यातील शेतकऱ्यांच्या सर्वांगीण हितासाठी जय महेश सागर कारखाना सक्षमपणे वाचवणे गरजेचे आहे. खासदार रजनी पाटील यांच्या प्रयत्नातून उभा राहिलेला आहे. शेतकरी केंद्रित दृष्टीने कारखाना राजकीय हस्तक्षेपा पासून वाचवणे ही शेतकरी हितासाठी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे.

दरम्यान तालुका काँग्रेसचे नारायण होके व अनु जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष दत्ता कांबळे यांच्या नेतृत्वाखाली एन. एस. एल. साखर कारखान्याचे एम डी गिरीश लोखंडे यांना भेटून आपल्या प्रशासनाला कुठल्याही राजकीय दबावाखाली काम करण्याची गरज नाही. एन. एस . एल. साखर कारखान्याचे हे युनिट सक्षम पने सुरू राहिले पाहिजे अशी भूमिका काँग्रेसची आहे.

आम्ही खासदार रजनी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वोतोपरी जय महेश साठी लढा उभारण्याची ग्वाही काँग्रेस नेते नारायण होके , अनु .जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष दत्ता कांबळे यांनी दिली यावेळी शहराध्यक्ष शेख रशीद , ॲड.इनामदार ,सतीश पटाईत,अहमद शेख आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.