राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांची कोर्टात सशर्त माफी

एनसीबचे विभागिय संचालक समिर वानखेडे कुटूंबीयाबाबतवक्तव्य प्रकरण

0

मुंबई, रयतसाक्षी: केंद्रीय अमली पदार्थ नियंत्रण विभागाचे (एनसीबी) विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या कुटुंबीयांबाबत यापुढे कोणतेही विधान करणार नाही अशी हमी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी मुंबई उच्य न्यायालयात दिली आहे. गे

सु

न्यायालयाने कोणतेही वक्तव्य करणार नसल्याची लेखी हमी देऊनही त्याचे हेतुत: उल्लंघन केल्याप्रकरणी तुमच्यावर अवमान कारवाई का केली जाऊ नये अशी विचारणा करत नवाब मलिक यांनी खडसावलं होतं. तसंच १० डिसेंबरपर्यंत प्रतिज्ञापत्राद्वारे स्पष्टीकरण देण्याचे आदेशही दिले होते.

नवाब मलिक यांनी उच्च न्यायालयात बिनशर्त माफी मागितली असून यापुढे कोणतीही विधाने करणार नसल्याची पुन्हा एकदा हमी दिली आहे.

 

नवाब मलिक यांच्याविरोधात समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव यांनी मानहानीचा दावा दाखल केला आहे. त्यातील अंतरिम दिलासा मिळवण्याच्या मागणीवर एकलपीठातर्फे निर्णय दिला जाईपर्यंत वानखेडे कुटुंबीयांविरोधात कोणतेही वक्तव्य करणार नाही, अशी लेखी हमी मलिक यांनी दिली होती. मात्र त्यानंतरही आपल्या कुटुंबीयांवरील आरोपांचे सत्र सुरूच असल्याची बाब ज्ञानदेव यांनी न्यायमूर्ती शाहरूख काथावाला आणि न्यायमूर्ती र्मिंलद जाधव यांच्या खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिली होती.

अवमान याचिका का दाखल करण्यात येऊ नये ; वानखेडे प्रकरणी नवाब मलिक यांना कौरवांची विचारणा

मलिक यांनी वानखेडे कुटुंबीयांविरोधातील आरोपपत्र कायम ठेवून न्यायालयाला दिलेल्या हमीचे उल्लंघन केल्याचेही ज्ञानदेव यांच्या वतीने अ‍ॅड. बीरेंद्र सराफ यांनी मंगळवारी झालेल्या सुनावणीच्या वेळी न्यायालयाला सांगितलं होतं. न्यायालयाच्या आदेशानंतर मलिक यांनी वानखेडे कुटुंबीयांविरोधात केलेल्या वक्तव्यांचा तपशील असलेले प्रतिज्ञापत्रही ज्ञानदेव यांच्यातर्फे न्यायालयात सादर करण्यात आले.

वानखेडे कुटूंबाविरोधात वक्तव्यकरणार नसल्याची मंत्री मलिक यांची हमी

त्याची दखल घेऊन ही वक्तव्ये मलिक यांनी वैयक्तिक पातळीवर केली की राजकीय पक्षाचे प्रवक्ते म्हणून केली आहेत, अशी विचारणा न्यायालयाने केली. त्यांनी वैयक्तिक पातळीवर वक्तव्ये केली असतील तर त्यांना आताच न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देऊन स्पष्टीकरण द्यायला सांगू, असेही न्यायालयाने बजावलं होतं. त्यावर मलिक यांनी ही वक्तव्ये राजकीय पक्षाचा प्रवक्ता म्हणून केल्याचे त्यांची बाजू मांडणाऱ्या अ‍ॅड. कार्ल तांबोळी यांनी न्यायालयाला सांगितलं होतं.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.