बालसाहित्य मुलांपर्यंत पोहोचले पाहिजे- साहित्यिक विठ्ठल जाधव

'आभाळाला फुटले पंख' मधील बालकवितांचे सादरीकरण

0

शिरूर कासार,रयतसाक्षी: बालसाहित्यात नव्यानेच प्रकाशित ‘आभाळाला फुटले पंख’ या डॉ. ज्योती कदम संपादित बालकविता संग्रहाचे उकिर्डा चकला येथील मुलांनी शुक्रवारी (दि. १०) सामुहिक सादरीकरण केले. मुलांच्या मनातील भाव आविष्कारातून कविता निर्माण होते असे साहित्यिक विठ्ठल जाधव यांनी सांगितले. मुख्याध्यापक भरत ढाकणे अध्यक्षस्थानी होते.
‘आभाळाला फुटले पंख’ या मराठी बालकवितांचे संपादन प्रकाशित झाले असुन त्याचे उत्स्फूर्त स्वागत चिमुकल्यांनी केले. मुलांना कथा, कविता आवडतात. बालवाङ्मय मुलांपर्यंत पोहोचले पाहिजे असेही साहित्यिक विठ्ठल जाधव यांनी यावेळी म्हटले.

तसेच गणेश आघाव, बाळासाहेब तोस्कर (ठाणे), हंसराज वैद्य (नांदेड), केशव कुकडे (परळी), प्रशांत असणारे, शिवाजी चाळक, उद्धव भयवाळ (औरंगाबाद), अलका नाईक, शरद ठाकर यांच्याही बालकविता आहेत.विठ्ठल जाधव यांच्या ‘अटर का पटर’, ‘मिशीवाली पाव्हुणी’, ‘जग’, ‘गीत गा’, ‘छोटा पहिलवान’, या कवितांचा संग्रहात समावेश आहे.

अर्णवी गायकवाड, वैष्णवी पालवे, ऋतुजा गिर्हे, हरीओम खेडकर आदी मुलांनी कवितांचे वाचन केले. ‘कप आणि बशी’, ‘अटर का पटर’, ‘दादा आमचा’, ‘काय मी होऊ?’, या रचना मुलांच्या पसंतीस उतरल्या. बाळू दराडे, सुरेखा खेडकर यांची यावेळी उपस्थिती होती.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.