लसीकरणासाठी झेडपीच्या सीईओ आदिवासी पाड्यावर

लवाजम्यासह नागरिकांची जागृती ; शिवशक्ती नगर; शंभर टक्के

0

नांदेड,रयतसाक्षी: कोवीड-19 च्या लसीकरणासाठी जिल्ह्यात ‘हर घर दस्तक’ मोहीम राबविण्यात येत आहे. शुक्रवारी (दि.१०)जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी आदिवासी प्रवण क्षेत्रातील किनवट तालुक्याचा दौरा केला.

तालुक्यातील घोगदरवाडी अंतर्गत शिवशक्ती नगर या आदिवासी पाड्यावर त्यांनी रात्री सात वाजता भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधला. सीईओ ठाकूर यांनी लसीकरणा संदर्भात गावक-यांचे प्रबोधन केले. त्यानंतर नागरिक लसीकरणासाठी स्वतः होऊन पुढे आले.

त्यामुळे शिवशक्ती नगर येथील 100% लसीकरणाचे उद्दीष्ट पूर्ण झाले आहे. यावेळी ग्रामस्थांच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांचा सत्कार करण्यात आला.
दरम्यान त्यांनी जलधारा, बोधडी व किनवट पंचायत समिती येथे अधिकारी व कर्मचाऱ्यांचा लसीकरणा संदर्भात त्यांनी आढावा घेतला.

यावेळी तहसीलदार मृणाल जाधव, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे, शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर, गट विकास अधिकारी सुभाष धनवे, गट शिक्षण अधिकारी अनिल महामुने आदींची उपस्थिती होती.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.