सुप्रीया सुळेंचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करत असल्याचा भाजपावर आरोप

0

रयतसाक्षी : गेल्या काही महिन्यांपासून भाजपा केंद्रीय तपास यंत्रणांचा विरोधकांच्या विरोधात गैरवापर करत असल्याची टीका विरोधी पक्षांकडून केली जात आहे. विशेषत: महाराष्ट्रातील सत्ताधारी पक्ष असलेले शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या पक्षांनी या मुद्द्यावरून भाजपावर आरोप केले आहेत.

सरकारमधील काही मंत्री आणि नेतेमंडळींवर ईडी, सीबीआय यांनी छापे टाकल्यानंतर त्यावरून राजकारण पेटलं आहे. या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी गुरुवारी लोकसभेत बोलताना भाजपावर हल्लाबोल केला. यावेळी बोलताना त्यांनी महाविकासआघाडी सरकार २५ वर्ष चालेल, असा ठाम निर्धार देखील बोलून दाखवला.

“हा एक प्रकारचा विक्रमच आहे!”
सुप्रिया सुळे यांनी यावेळी ईडी आणि सीबीआयनं राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावर टाकलेल्या छाप्यांविषयी सवाल उपस्थित केला. “अनिल देशमुखांच्या घरावर एका वर्षात ७ वेळा छापा टाकला गेला. हा एक प्रकारचा विक्रमच आहे. कल्पना करा, तुम्ही एकाच कुटुंबावर ७ वेळा छापा टाकला.

मग पहिल्या सहा वेळा काय चुकलं?” असा प्रश्न सुप्रिया सुळेंनी विचारला आहे. “तपास यंत्रणा आता संबंधित व्यक्तीच नाही, तर त्यांच्या कुटुंबाला देखील टार्गेट करत आहेत”, असं त्या म्हणाल्या.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.