धर्माबादेत आवतारला के.के.नावाचा जुगार!

शेकडो‌ंचे संसार रस्त्यावर; आलिशान इमारत, अद्यावत सुविधा चर्चेला उधाण..

0

धर्माबाद, (दि.११)लक्ष्मण पाटील येताळे: धर्माबाद शहर तालुक्याचे ठिकाण येथून जवळच अगदी पाच किलोमीटर अंतरावर तेलंगणा राज्याची सिमा आहे. व्यवसायिक, व्यापारी, ग्राहकांच्या खरेदी-विक्री व्यवहारातून रोज कोट्यावधींची उलाढाल होते. याचाच गैरफायदा घेऊन शहरात एक नविन सामांन्यांच्या लूटीसाठी के.के. नावाचा जुगार अवतरला आहे. आलिशान इमारतीमध्ये अद्यावत सुविधांच्या रेलचेलीमध्ये सुरू असलेल्या या जुगार आडव्या विषयी चर्चेला उधाण आले आहे.

मिरचीसाठी प्रसिद्ध असलेल्या धर्माबाद शहरात तेलंगणा राज्याती परप्रांतीयांचा कायम राबता असतो. राज्यासह परप्रांतीय तेलगू भाषीकांच्या वर्दळीमुळे शहरखच्या गल्ली बोळांना कायम यात्रेचे स्वरूप असते .शहरातील रत्नाळी गेट, छञपती शिवाजी महाराज चौक,पानसरे चौक,नरेंद्र चौक,ते बाळापुर चौक,हा शहरातला मुख्य रस्ता. बाजार समिती, कृषी, किराणा,सराफा, कापड, दुकाने याच रस्त्यावर आहेत. शालेय विद्यार्थी, शहरात ये-करणारे नागरिक याच रस्त्याचा वापर करतात . त्यामुळे शहराची मुख्य बाजारपेठ म्हणून या रस्त्याचे अस्तित्व टिकून आहे .

याच मुख्य रस्तात्यास लागून एका नामांकित संस्थेच्या मोकळ्या भूखंडास‌ लागून आलिशान इमारत रहदारीतील नागरिकांचे सध्या लक्ष वेधून घेत आहे . तरते यासाठी भिंतीला वातानुकूलित यंत्र. सिसिटिवी कॅमेरे अशा आलिशान इमारतीतील भोवती मात्र इमारतीमध्ये प्रवेश करणारा नागरीकदृष्टीस पडू नये म्हणून लाकडं रोऊन ग्रीन मॅट चार आडूसा केला आहे .

दरम्यान इमारती भोवती तेलुगु भाषिकांच्या आलिशान चारचाकी वाहनांची रिघ लागलेली असते . याशिवाय वाहनांची विषेश देखरेखीखाली वाहनतळाची व्यवस्था केलेली आहे . तसेच लाईट गेली तर जनरेटरची सोय.. आजुन चि..म..बिर्याणी ची ही सोय शहराच्या मध्यवस्तीतील या गोरख धंद्याविषयी शहरवाशी अनभिज्ञ आहेत. दरम्यान, इमारतीची पाहणी करू नये म्हणून गैरकायद्याच्या मंडळींचा सभोवताली खडा पहारा आहे .

 

चुकून एखादा नवीन व्यक्ती जर दिसला की, आपको कौन होना, ईधर क्या है? कैसे क्या आये अशी धमकीवजा चौकशी करून पिटाळून लावतात. सखोल चौकशी अंती या ईमारती मध्ये के.के.नाम का खेल चलता है साब!अस म्हणत एक व्यक्ती कानाडोळा करत तेथून निघून गेला .दरम्यान, खेळ माञ जो खेळतो त्यालाच त्या खेळाचा प्रकार कळतो.

ये-जा करणा-या लोकांचा वावर पाहून शहराच्या मुख्य रस्तात्याने जाणारया पदचारयाचे लक्ष वेधून घेतले जात आहे. याची चर्चा शहरात होत आहे . धर्माबाद पोलिस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलिस निरिक्षक ….. यांनी लक्ष घालून हा अवैध हायप्रोफाइल जूगार खड्डा उध्वस्त‌ करण्याची मागणी शहरवाशीयांतून होत आहे .

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.