एमआयएम ची तिरंगा रॅली मुंबई त दाखल

खासदार ओवेसींच्या सभेकडे लक्ष

0

रयतसाक्षी; मानखुर्दमधून इम्तियाज जलील यांचा ताफा सभास्थळाकडे रवाना झाला आहे, काही क्षणात ताफा चांदिवलीत सभास्थळी जाणार आहे, तिथे एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी सभेला संबोधित करणार आहेत. ‘चांदिवलीतील सभा होणारच’ अशी घोषणा इम्तियाज जलील यांनी केली आहे.

वाशी टोलनाक्यावर अडकला होता ताफा

मुस्लिम आरक्षणाच्या मागण्यांसाठी औरंगाबादेतून मुंबईकडे निघालेला ताफा पोलिसांनी वाशी टोलनाक्याजवळ थांबवला होता, मात्र पोलिसांशी चर्चा केल्यानंतर खासदार इम्तियाज जलील यांनी वाशी टोलनाका पार केला आहे. एमआयएमच्या रॅलीला जाण्यास पोलिसांनी परवानगी दिलेली आहे. पंरतु आता खारघर टोल नाक्यावर मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

मुस्लिम आरक्षण, वक्फ बोर्डाच्या जमिनी आणि इतर मागण्यांसाठी खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्त्वाखाली एमआयएमची रॅली औरंगाबादहून मुंबईच्या दिशेने निघाली आहे. मात्र या रॅलीला मुंबईत प्रवेश मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. स्वतः राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी हे स्पष्ट केले आहे.

मुंबई पोलिसांनी काढलेला आदेश अंतिम समजायचा अशी प्रतिक्रिया गृहमंत्र्यांनी दिली आहे. ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर मुंबईत राजकीय सभा आणि रॅलींना तुर्तास बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे एमआयएमच्या रॅलीला मुंबईत एन्ट्री मिळणार का? हे आता पाहावे लागणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.