ग्रामीण भागातील पहिली ते चौथीच्या शाळा आज पासून सुरू

शाळा सुरू करण्यासाठी आवश्यकत्या कार्यवाहीच्या सूचना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी दिल्या आहेत.

0

नांदेड, रयतसाक्षी : जिल्ह्यातील ग्रामीण भागातील इयत्ता पहिली ते चौथी व महापालिका हद्दीतील इयत्ता पहिली ते सातवीचे वर्ग असलेल्या सर्व शाळा (दि.१३ )डिसेंबर पासून सुरू होणार आहेत.

सर्व पर्यवेक्षकीय अधिकारी आणि शाळा पातळीवरील मुख्याध्यापकांनी शाळा सुरू करण्यासाठी आवश्यकत्या कार्यवाहीच्या सूचना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी दिल्या आहेत.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ग्रामीण भागातील इयत्ता पहिली ते चौथी आणि महापालिका क्षेत्रातील इयत्ता पहिली ते सातवीचे वर्ग सुरू करण्यात आलेले नव्हते. शासन परिपत्रक (दि.२९ )नोव्हेंबर २०२१ नुसार या शाळा (दि.१) डिसेंबर २०२१ पासून सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले होते .

दरम्यान, नांदेड जिल्ह्यातील कोरोना लसीकरणाची स्तिती पाहता या शाळा (दि.१३) डिसेंबर २०२१ पासून सुरू करण्याबाबत जिल्हाधिकारी नांदेड यांनी सूचित केले होते. त्यामुळे आता या शाळा (दि.१३) डिसेंबर २०२१ पासून सुरू करण्यात येत आहेत.

मोठ्या खंडानंतर इयत्ता पहिली ते चौथीचे वर्ग सुरू होत असून शाळा बाहेर येणाऱ्या मुलांना शैक्षणिक प्रवाहात नियमित समान लिहिण्यासाठी विशेष प्रयत्न करणे आवश्यक आहे.

सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण करून घेणे, विद्यार्थ्यांच्या पालकांना गर्दी टाळण्यासाठी शाळेच्या परिसरात न येण्याबाबत आवाहन करणे, कोविड संबंधी सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आणि जास्त विद्यार्थी असलेल्या शाळांमध्ये दोन सत्रात, एका बाकावर एकच विद्यार्थी, दोन बाकांमध्ये सहा फूट अंतर, एका वर्गात जास्तीत जास्त १५ ते २० विद्यार्थी बसतील अशा पद्धतीचे नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.

हात साबणाने धुणे, मास्कचा वापर, कोणतेही लक्षण आढळल्यास नजीकच्या आरोग्य केंद्रात संपर्क करणे, विद्यार्थी कोरोना ग्रस्त आढळला तर शाळा बंद करून शाळा निर्जंतुकीकरण करणे आदी कार्यवाही मुख्याध्यापकांनी करावयाची आहे.

गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी आणि केंद्रप्रमुख यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील सर्व शाळांची तयारी करून सर्व मुख्याध्यापकांना अवगत करावयाचे आहे. दरम्यान (दि.२९) नोव्हेंबरच्या शासन परिपत्रकाचे नीट वाचन करून त्यानुसार सर्व शाळा स्तरावर अंमलबजावणी करण्याची निर्देश प्राथमिकच्या शिक्षण अधिकारी सविता बिरगे यांनी दिले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.