धाकधूक वाढली , सस्पेन्स कायम

नगरपंचायत सार्वत्रीक निवडणूक; उमेदवारांमध्ये संभ्रम

0

शिरूर कासार, रयतसाक्षी: नगरपंचायतीच्या सार्वत्रीक निवडूकांसाठी ओबीसी आरक्षणावर उद्या मा. उच्च न्यायालयामध्ये सोमवारी (दि.१३) सुनावणी असल्याने उमेदवारांची धाकधुक तर वाढलीच . पण निवडणूक प्रक्रीयेबाबतही संभ्रम निर्माण झाला आहे .

मा. उच्च न्यायालयाने ओबीसी प्रवर्गासाठी २७% पेक्षा जास्त राजकीय आरक्षण देता येणार नसल्याचा निर्णय दिल्याने होऊ घातलेल्या नगरपंचायत निवडणूकीसाठी निवडणूक आयोगाने ओबीसी प्रवर्गासाठी राखीव जागेची निवडणूक स्थगिती केली . प्रशासनाला तसे आदेश जारी करत नामनिर्देशनपत्र स्वीकारण्यावरही प्रतिबंध जारी केले.

दरम्यान, आयोगाच्या निर्णयामुळे राज्यभरात असंतोष निर्माण झाला. याशिवाय विरोधी पक्षाने राज्यसरकारवर आरोपांच्या फायरी झाडत मा. उच्च न्यायालयाचा आदेश म्हणजे सरकारचा नाकर्तेपणा असल्याचा आरोप‌ केला . निवडणूक प्रक्रीयेतील असमतोलामुळे दोन दिवसांपूर्वी राज्य सरकारच्या कॅबीनेट बैठकीमध्ये सर्व जागांच्या निवडणूका सोबत घेण्यावर जवळपास शिक्कामोर्तब झाले.

दरम्यान, सरकार पक्षाकडून दाखल करण्यात आलेल्या ओबीसी आरक्षण याचीकेवर सोमवारी (दि.१३) मा. उच्च न्यायालयात सुनावणी होणार असल्याने निवडणूक प्रक्रीयेचा सस्पेन्स वाढला असून ओबीसी साठी राखीव जागांसाठी निवडणूकी बाबत संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.

सरकारचा एकूण प्रवर्गासाठीच्या राखीव जागांची मतदान प्रक्रीया सोबत घेण्याचा निर्णय तर, दुसरीकडे निवडणूक आयोगाने ओबीसी प्रवर्गासाठी राखीव जागेवर निवडणूकीस दिलेली स्थगिती या सर्व कोढ्याचा उलगाडा उद्या सुणावणीच्या निर्णयातून उलगडणार असल्याने धाकधुक वाढली आहे .

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.