वाढदिवसाला भव्यदिव्यता दाखवून गरिबांच्या पोटाची भूक शमणार आहे का?; पंकजा मुंडेंचा धनंजय मुंडेंवर अप्रत्यक्ष निशाणा

“आज गडावर मुंडे साहेबांच्या जयंतीत शरद पवार सामील झाल्यासारखे मला वाटत आहे”

0

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा आज ८१ वा वाढदिवस असून यानिमित्ताने पक्षाकडून वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. दुसरीकडे भाजपाचे स्वर्गीय नेते गोपीनाथ मुंडे यांची जयंती असून यानिमित्ताने अभिवादन करण्यासाठी गोपीनाथ गडावर असंख्य समर्थकांनी हजेरी लावली. यावेळी पंकजा मुंडे यांनी उपस्थितांना संबोधित केलं. भाषणादरम्यान पंकजा मुंडे यांनी अप्रत्यक्षपणे शरद पवारांच्या वाढदिवसावरुन धनंजय मुंडेंवर अप्रत्यक्ष निशाणा साधला.

“मी आज कार्यक्रम संपल्यानंतर मी थेट उसाच्या फडात जाणार आहे. तिथे ऊस तोडणी कामगारांसोबत जास्तीत-जास्त वेळ घालवणार आहे. प्रीतम मुंडे वीटभट्टी कामगारांसोबत जाणार आहे. आम्ही स्वयंपाक केला असून सोबत डबा घेतला आहे. त्यांच्यासोबत बसून डब्यातलं खाणार आहे. आजचा दिवस त्यांच्यासाठी समर्पित आहे,” असं पंकजा मुंडे यांनी सांगितलं.

दरम्यान यावेळी शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त सजलेल्या परळीवरून पंकजा मुंडेंनी धनंजय मुंडेंवर निशाणा साधला. “स्वतःचा वाढदिवस किंवा आपल्या नेत्याचा वाढदिवस साजरा करताना भव्य दिव्यता दाखवून सामान्य लोकांना काय मिळणार? खूप मोठी प्रतिकृती बनवली, पेंटिंग केलं म्हणजे गरिबांच्या पोटाची भुक शमणार आहे का? हे आमच्या मुंडे साहेबांचे संस्कार नाहीत,” असं त्या म्हणाल्या.

पुढे त्यांनी म्हटलं की, “आज शरद पवारांचाही वाढदिवस आहे आणि परळी पूर्ण सजलीये असं मला विचारण्यात आलं. म्हटलं त्यांनाही वाढदिवसाच्या शुभेच्छा. मुंडे साहेबांच्या नगरीत शरद पवारांचे मोठे बॅनर लागलेत…काय फरक वाटतो? असं विचारलं असता आज गडावर मुंडे साहेबांच्या जयंतीत शरद पवार सामील झाल्यासारखे मला वाटत आहेत. यात काय गैर आहे. त्यांनाही शुभेच्छा”.

 

“मी सत्ता बघितली आहे. त्यासोबत पराभवदेखील बघितला आहे. परंतु, सत्ता असो किंवा नसो मी काम करत राहीन.सगळ्यात मोठा मुंडे साहेबाचा वारसा ही देणगी मला मिळाली आहे. ” अशा भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.