सांगवी (सा.) सांगवी ते विजेचे शॉक लागून एकाचा मृत्यू 

0

केज , रयतसाक्षी : तालुक्यातील सांगवी (सारणी) येथे हनुमंत ज्ञानोबा देशमुख वय ३६ वर्षे यांचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाला.
या बाबतची माहिती अशी की, दि. १२ डिसेंबर रोजी दुपारी १:०० वा. च्या. दरम्यान हनुमंत ज्ञानोबा देशमुख वय ३६ वर्ष रा. मस्साजोग याना सांगवी (सारणी) शिवारात विजेचा शॉक लागून मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी व एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे.

या प्रकरणी केज पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हे प्रक्रिया संहिता १७४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात येत आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील तपास करीत असून धनपाल लोखंडे व उमेश आघाव हे त्यांना साहाय्य करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.