आष्टीत खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रमास प्रतिसाद

व्हर्च्युअल रॅली,पवार साहेबांचे विचार कार्यकर्त्यांनी सामान्य जनतेपर्यंत पोहोचावेत--आमदार बाळासाहेब आजबे

0

आष्टी, रयतसाक्षी : पद्मभूषण खासदार शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आष्टी येथे आमदार बाळासाहेब आजबे काका यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने राज्यभरात राबवण्यात आलेल्या ऑनलाईन अभिष्टचिंतन सोहळ्याचे खास नियोजन साई मंगल कार्यालय येथे करण्यात आले होते.आष्टी तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बोलतांना आमदार आजबे म्हणाले कीपवार साहेबा मुळे लवकरच खुंटेफळ साठवण तलावाचे काम सुरु होत आहे,त्यांचे विचार तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांची असल्याचे मत यावेळी बोलताना आमदार बाळासाहेब आजबे यांनी सांगितले.

येथील साई दत्त मंगल कार्यालय मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा पद्मभूषण शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी आमदार बाळासाहेब आजबे माजी आमदार साहेबराव दरेकर नाना माजी जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर शिवाजी राऊत तालुका अध्यक्ष अण्णासाहेब चौधरी डॉक्टर विलास सोनवणे डॉक्टर मधुकर हंबर्डे सुनील नाथ सुभाष वाळके हरिभाऊ दहातोंडे सुधीर जगताप यांची प्रमुख उपस्थिती होती.

स्व.खा. गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंतीनिमित्त मान्यवरांच्या हस्ते यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले,यावेळी बोलताना आमदार आजबे म्हणाले की मतदारसंघांमध्ये पाणी आणण्यासाठी पवार साहेबांचे मोठे योगदान आहे.
लवकरच खुंटफळ साठवण तलावाचे काम पवार साहेबांनी लक्ष घातल्यामुळे सुरू होणार आहे. साहेबांच्या विचारांनी अनेक लोक प्रेरित होऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहेत मला काम करत असताना पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा आमदार असल्याचा अभिमान वाटतो राष्ट्रवादीचा कार्यकर्ता वाढीसाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे .

घराघरांमध्ये पवार साहेबांचे विचार कार्यकर्त्यांनी पोहोचावेत, आपण आजपर्यंत मतदारसंघात दोनशे ते अडीचशे कोटी रुपयांचा निधी आणला असून यापुढेही पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करणार आहोत . येणाऱ्या काळात पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली मतदार संघातील सर्वच क्षेत्र सिंचनाखाली येणार असल्याचा विश्‍वास यावेळी बोलताना त्यांनी व्यक्त केला.

माजी आमदार साहेबराव दरेकर बोलताना म्हणाले की पवार साहेब हे दूरदृष्टीचे नेते असून वेगवेगळ्या क्षेत्रात त्यांनी महाराष्ट्र हे देशातील आघाडीचे राज्य बनवले आहे. यशवंतराव चव्हाणनंतर एवढा दूरदृष्टीचा नेता झालेला नाही कार्यकर्त्यांची जाण असणारे पवार साहेब हे आपणाला लाभलेले खंबीर नेतृत्व आहे .

यामुळे येणार्‍या काळात ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सरकार सत्तेत येणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
जिल्हा परिषद माजी अध्यक्ष शिवाजी राऊत यांनीही बोलताना खासदार शरद पवार यांच्या कार्याचा गौरव केला कार्यक्रमाचे प्रस्ताविक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष अण्णासाहेब चौधरी यांनी केले तर उपस्थितांचे आभार ज्येष्ठ नेते काकासाहेब शिंदे यांनी मानले या कार्यक्रमासाठी तालुक्यातील मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.