नगरपंचायत निवडणूक प्रचाराचा धुराळा उडणार

आष्टी, ४२,पाटोदा ४४शिरुर कासार३७ उमेदवार रिंगणात

0

 

आष्टी, पाटोदा, शिरुर कासार,रयतसाक्षी : नगरपंचात निवडणूक प्रक्रीयेनुसार सोमवार (दि.१३) नामनिर्देशन ‌पत्र मागे‌ घेण्याची अंतिम मुदत होती . दरम्यान, एकून १७ पैकी १३ जागांसाठी मतदान प्रक्रीया होणार असून आष्टी ४२ ,पाटोदा ४४, शिरुर कासार ३७ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

नगरपंचायतीच्या सार्वत्रीक निवडणूकांसाठी मा. उच्च न्यायाने ओबीसी प्रवर्गास २७% आरक्षणाची मर्यादा ओलांडता येणार नसल्याचा निर्णय जारी केला. मा.उच्च न्यायालयाच्या निर्णया विरोधात राज्य सरकारच्या वतिने याचिका दाखल झाल्याने निवडणूक आयोगाने ओबीसी च्या राखीव जागेवरील निवडणूकीला स्थगिती दिली.

त्यानुसार प्रशासनाने ओबीसी उमेदवारांचे नामनिर्देशनपत्र स्वीकरण्यास स्थगित केले. त्यामुळे एकून १७‌ पैकी १३ जागांसाठी नामनिर्देशनपत्र स्विकारण्यात आले यामध्ये छाणणी नंतर आष्टी १२४ , पाटोदा ‌१२१, शिरुर कासार १२७ अर्ज वैध‌ ठरविण्यात आले होते. सोमवारी नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची अंतिम मुदतीच्या दिवशी शिरुर कासार नगरपंचायती साठी १२७ पैकी ९० अर्ज मागे घेण्यात आल्याने ३७‌उमेदवार रिंगणात आहेत.

पाटोदा‌ १२१ पैकी ७७ अर्ज मागे घेण्यात आल्याने‌ ४४ उमेदवार तर आष्टी नगरपंचायतीसाठी १२४ पैकी ८२ अर्ज मागे घेण्यात आल्याने ४२ उमेदवार रिंगणात आहेत. दरम्यान, १७‌पैकी १३ जागांसाठी निवडणूक प्रक्रीया होणार असल्याने प्रचाराचे‌ नारळ फोडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

निवडणूकांचा लढती निश्चीत झाल्या असल्यातरी प्रभागनिहाय‌ अपक्ष उमेदवार पक्षांच्या उमेदवारांची डोकेदुखी ठरणार आहे. शिरुर कासार नगरपंचायतीसाठी तीरंगी लढत होत असली तरी मोजके प्रभाग वगळता इतर प्रभागामध्ये अपक्ष उमेदवार पक्षांच्या उमेदवारांची डोकेदुखी ठरणार आहे.
–+-+

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.