समिर वानखेडंची आज परीक्षा : जात पडताळणी समिती राहणार हजर

दलित सिद्ध करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे सादर करायची आहेत आणि चौकशी समितीच्या प्रश्नांची उत्तरे देखील द्यावी लागणार आहेत.

0

महाराष्ट्र सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांच्या आरोपानंतर धर्म-जातीय वादात अडकलेले नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे आज मुंबई जिल्हा ‘जात प्रमाणपत्र’ चौकशी समितीसमोर हजर होणार आहेत. आज त्यांना स्वतःला दलित सिद्ध करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे सादर करायची आहेत आणि चौकशी समितीच्या प्रश्नांची उत्तरे देखील द्यावी लागणार आहेत.

भीम आर्मीच्या महाराष्ट्र युनिटचे अध्यक्ष अशोक कांबळे यांच्या तक्रारीच्या आधारावर आयोगाने नोव्हेंबरच्या अखेरीस वानखेडे यांना समन्स बजावले होते. सरकारी नोकरीसाठी ‘महार’ जातीचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी वानखेडे यांनी स्वत:बाबत खोटी माहिती दिल्याचा आरोप कांबळे यांनी केला होता.

आणखी एका दलित कार्यकर्त्याने तक्रार केली
दलित कार्यकर्ते मनोज संसारे यांनीही वानखेडे यांच्यावर बनावट जात प्रमाणपत्र बनवल्याचा आरोप करत त्यांच्याविरोधात तक्रार केली आहे. त्यांनी लावलेल्या आरोपांनुसार, वानखेडे हे जन्माने मुस्लीम आहे आणि शरीयतनुसार विवाहित आहे आणि अधिकाऱ्याने आपला व्यावसायिक फायदा वाढवण्यासाठी बनावट प्रमाणपत्र मिळवल्याचा आरोप आहे.

मुस्लिम असल्याचा पुरावाही समितीला देण्यात आला आहे
दोन्ही तक्रारदारांचे प्रतिनिधित्व करणारे वकील नितीन सातपुते यांनी समितीसमोर दोन कागदपत्रे सादर केली. यामध्ये समीर वानखेडे यांच्या जन्म प्रमाणपत्राची फोटोकॉपी आणि बृहन्मुंबईच्या कार्यकारी दंडाधिकारी यांनी जारी केलेल्या त्यांच्या जात प्रमाणपत्राच्या फोटोकॉपीचा समावेश आहे. या कागदपत्रांच्या आधारे समितीने जात प्रमाणपत्र प्रकरणाची चौकशी सुरू करण्याचा निर्णय घेतला आणि वानखेडे यांना 14 डिसेंबर रोजी दुपारी 3 वाजता पुढील सुनावणीसाठी बोलावले.

आर्यन खानच्या अटकेनंतर मलिक हे सतत वानखेडेंवर हल्ले करत आहेत

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.