राष्ट्रवादीने आमदार धसांवर आरोपांच्या तोफा डागल्या!

नगरपंचायत निवडणूक प्रचारस प्रारंभ ; गांधी लढे गोरोंसे हमारी लढाई चोरोंसे म्हणत घरं पाडणारा आमदार, देवस्थानच्या जमीनी हडप‌ करणारा ..... , भ्रष्ठाचाराचा केंद्रबिंदू हिन आशा‌ उपाद्या

0

: नगरपंचायतीच्या सार्वत्रीक निवडणूक प्रचाराच्या रनधुमाळीस मंगळवारी (दि. १४) सुरवात झाली . शहराच्या ग्रामदैवतांना नारळ वाढवून राष्ट्रवादीने उमेदवारांच्या प्रचारास प्रारंभ केला . राज्याचे नगरविकास मंत्री प्राजक्त तनपुरे , युवा प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख,आमदार निलेश लंके , आमदार बाळासाहेब आजबे, माजी आमदार रामकृष्ण बांगर यांची प्रमुख‌ उपस्थिती होती.
यावेळी उपस्थितांनी विविध उपाध्या देत भाजपाचे आमदार सुरेश धस यांच्यावर आरोपांच्या फायरी झाडल्या.
शिरूर कासार नगरपंचायत निवडणूक उमेदवारांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादीच्या वतीने शहरातील गांधी चौकात सभेचे आयोजन करण्यात आले होते. पहिल्याच सभेने प्रचारास प्रारंभ करत राष्ट्रवादीच्या पदाधिकारी , नेत्यांनी भाजपाचे आमदार सुरेश धस यांच्यावर विकासाच्या नावाने शहर भकास केल्याचा आरोप करत हिन उपाध्या दिल्या.

पाणी प्रश्न कळीचा मुद्दा : प्रचार सभेत गेल्या पाच वर्षांपासून शहरवासीयांना विकतच्या पाण्यावर तहान भागवावी‌ लागत आहे. नगरपंचायत प्रशासनाकडून घसा कोरडा करण्यात इतपत महिन्यातून एकवेळा तेही २५ मिनिटे पाणी पुरवठा करण्यात येत असल्याने प्रचार सभेत पाण्याचा प्रश्नच कळीचा मुद्दा ठरला . शिवाय नगरपंचायतीमध्ये परिवर्तन अटळ असल्याचा विश्वास व्यक्त करत शहरासाठी शासनाच्या सुवर्ण जयंती नगरोत्थान योजने अंतर्गत २५ कोटीची पाणीपुरवठा योजना राबवण्याचे आश्वासन यावेळी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिले.

कोण काय म्हणाले :

बबन घोरपडे – घरं पाडणारा आमदार:
देशात विकास कामासाठी घरं बांधणारे आमदार आम्ही पाहीले‌, पण‌ घरं पाडणारा आमदार पहिल्यांदाच पहातो . शंभर रुपये रोजगार मिळवणार्यास तहान भागवण्यासाठी रोज ३०‌ रुपये खर्चुन पाणी विकत घ्यावे लागते हे दुर्दैव . शिरुच वैभव माफी यांच्या घश्यात घालण्याचा डाव आहे. ‘ गांधीजी‌लढले गो-यांशी नी आमची लढाई चोरांशी , परिवर्तनावर विश्वास करत भाजपा आमदार धसांवर आरोप केले.

रामकृष्ण बांगर – तीनही शहरं भकास केली : गेली पंचवीस वर्षे लुटून खानच्या साठी आमदाराने तीन नगरपंचायती कार्यकर्त्यांच्या ताब्यात दिल्या . पाटोद्यात‌३० लाखांच्या कमासाठी तीन कोटी रुपये उचलले यांची चौकशी व्हायला पाहिजे. भाजपा जातीयवादी पक्ष आहे . माफीया , पैशावाले उमेदवार उभे केले असले तरी पैशाच्या डोंगराला माणसाचा सागर भूईसपाट करून परिवर्तन घडऊन आणेल आत्तापर्यंत विकासाच्या नावाखाली तीनही शहरं भकास केली

महेबुब शेख – अंगावर आलात तर शिंगावर घेऊ :
शहर नगरपंचायतीच्या १७ पैकी १३ जागेसाठी निवडणूक होत आहे .पण १७‌ जागेच्या उमेदवारीत बदल होणार नाही . प्रभाग क्रमांक ७ मध्ये पुरस्कृत उमेदवार आहे . एकून उमेदवारांमध्ये १२ उमेदवार तरुण आहेत तरुणांना संधी देणारा पक्ष राष्ट्रवादी आहे. विरोधकांना चांगल काम करण्यापेक्षा उपद व्यापात जास्त रस आहे. शहरवासीयांना पिण्याच्या पाण्यावर वर्षाला सात हजार ५०० रुपये खर्च करावे‌ लागतात. शहरातील रस्त्यांचा निधी स्वतः शेतात रस्ता बनविण्यावर खर्च केला जातो. शहरात एकही खुला भुखंड ठेवला नाही, शासन नियमांनुसार आत्तापर्यंत जवळपास चार एक्कर एवढा खुला भुखंड राहीला असता . शासकीय कार्यालयांना जागा शोधण्याची वेळ आली नसती. माणसांचं सोडा यांना देवही पुरले नाहीत पुर्वीच्या काळात आपल्याला  वाड-  वडिलांनी देवांना‌ दिलेल्या जमीनीवर दरोडा टाकणार्या आमदारा कडून माणसांनी विकासाची अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे. शिरूर शहरातील व्यापार्यांची पेठेतून नदीत उतरण्यासाठी पुलाची मागणी आहे. गेल्या तीन वर्षांपासून अष्टीच्या चक्रामध्ये खर्च झालेल्या इंधनाच्या वर्गणीतून पुलाचे काम झाले असते. व्यापार्यांच्या मागणी नुसार आमदार‌ बाळासाहेब आजबे यांनी या कामासाठी २० लाख रुपयांचे पत्र दिले आहे . शहराच्या पाणी प्रश्नासाठी २५ कोटी रुपयांची‌ नगरोत्थान पाणीपुरवठा योजना प्रस्तावीत आहे. अवघ्या पाच कोटींच्या निधीत शहरातील रस्ते चकाचक होतील . सोशल मिडीयाच्या युगात राजकारणामध्ये खोटं बोलून चालत नाही, अन्यथा तरुणाई चित्रफित लाऊन ‌’क्या हुवा तेरा वादा’ दाखवते . शहरवाशीयांवर भरवसा नाही म्हणून परगांवच्या लोकांचे मतदार यदीत‌ नावे समाविष्ट करण्याच घाणेरडं राजकारण केल जात आहे. लोकशाही मार्गाने‌निवडणूकीला सामोरं जात आहोत सय्यम बाळगा अन्यथा ‘अंगावर आलात तर शिंगावर घेऊ,
गांधी लढे गोरों से‌ , हम लढेंगे चोरोंसे

बाळासाहेब आजबे – डोळे बंद‌केलेत‌खडे मारू नका:

आष्टीत महाविकास आघाडी आणि पाटोदा, शिरूर मध्ये राष्ट्रवादी घ्या बाजूने‌ मतदरांचा‌ कौल आहे . शब्द देतो सत्ता द्या शहराचा कायापालट करतो. रस्त्याच्या कामासाठी २५ कोटींचे पत्र दिले. देवस्थान, वक्तबोर्डाच्या जमीनी प्रकरण पुढे आलंय आणखी बरंच काही बाकी आहे. आम्हाला हारामाची पैसा नकोय अन्यथा पुढच्या पिढ्या आम्हाला हाताखालून काढतील . विकास केला असता तर बोगस मतांचा कशाला आधार घ्यायला लागला नसता. मी डोळे बंद केलेत खडे मारू नका पत्र्याच्या घरात राहतोय त्याचा अभिमान आहे. ताकतीने रडायचं तसं काही असलं तर कळवा .
___

निलेश लंके – भाई आमचे नेते :
प्रतीष्ठेसाठी नाही तर शहरीकरणाचा डी निवडणूक लढवायची आहे . भ्रष्ठाचार कसा करावा हे नगरपंचायत चालवणार्याकडून शिकलं पाहीजे शिरूर नगरपंचायत ही भ्रष्टाचाराचं केंद्रबिंदू म्हणावं लागेल आदर्श आमदार म्हटल की राज्यात काकाचं नांव पुढं येत शहरात विकासाची गंगा आणायची असेल तर सत्ता द्या , नगरविकास खात्याचे मंत्रीच तुमच्या समोर आहेत. राज्याच्या तिजोरीची चावी त्यांकडे आहे त्यांच्या सानिध्यातली मंडळी तुम्हाला लाभली आहे . ‘भाई ‘ आमचे नेते आणि नेत्यांचा शब्द टाळणं कार्यकर्त्यांची कर्तव्य असतं.

मंत्री प्राजक्त तनपुरे – परिवर्तन घडवा जास्तीचा निधी देऊ:
शहरवासीयांची पदाधिकार्यांकडून मुलभूत गरजा एवढीच माफक अपेक्षा असते . शहर विकासासाठी खुले भुखंड आवश्यक आहेत . शहराच्या पाणीपुरवठ्याचा विषय गंभीर आहे. शासनाच्या सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेतून पाणीपुरवठा पाठपुरावा तुम्ही करा जीवन प्राधिकरणाकडून तांत्रीक मान्यतेची मी पाहतो . त्याचबरोबर प्रशासकीय मान्यताही मिळवू . शासनाच्या प्रधानमंत्री घरकुल योजनेसाठी पात्र ४९८ लाभार्थींना केंद्र सरकारकडून आद्याप पर्यंत सात कोटी रुपये येणं आवश्यक असताना केवळ तीन कोटीच प्राप्त झाले आहेत. भाजपाचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत . घरकुल लाभार्थींचे पैसे मिळऊन देऊ, परिवर्तन घडवा जास्तीत जास्त निधी देऊ .

 

 

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.