बीड शहरात दिवसाढवळ्या युवकाचा खून

वर्दळीच्या ठिकाणी झालेल्या या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

0

बीड रयतसाक्षी: अज्ञात तीन ते चार जणांनी तीक्ष्ण हत्याराने वार करून एका युवकाचा दिवसाढवळ्या खून केल्याची घटना आज मंगळवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास बसस्थानकासमोरील एचडीएफसी बँकेसमोर घडली. वर्दळीच्या ठिकाणी झालेल्या या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

  • बीड शहरातील खासबाग परिसरातील शेख शाहिद शेख सत्तार (वय 24 ) असे मृत युवकाचे नाव असल्याचे समजते. तीन ते चार जणांनी तीक्ष्ण हत्याराने त्याच्या पोटावर आणि छातीवर सपासप वार केले. या हल्ल्यात युवक गंभीर रित्या जखमी झाल्याने त्याला तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केले. हल्लेखोरांपैकी एकाला ताब्यात घेतल्याचे समजते भरदिवसा घडलेल्या घटनेने जिल्हाभरात खळबळ उडाली आहे. सदरील घटनेनंतर जिल्हा रुग्णालयाच्या गर्दी झाली होती.
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.