ठाकरे सरकार पडणार का? काय म्हणाले राज ठाकरे

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी औरंगाबादमध्ये पत्रकारपरिषदेत आपलं मत व्यक्त केलं आहे

0

राज्यातील महाविकास आघाडी सरकार हे लवकरच पडणार आहे, राज्यात लवकरच भाजपाचं सरकार येणार आहे. अशा प्रकारची विधानं भाजपा नेत्यांकडून केली जात आहेत. केंद्रीयमंत्री नारायण राणे, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी या संदर्भात आतापर्यंत विधानं केल्याचं समोर आलेलं आहे. तर, भाजपा नेत्यांकडून केल्या जाणाऱ्या सरकार पडण्याबाबतच्या वक्तव्यांच्या पार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी औरंगाबादमध्ये पत्रकारपरिषदेत आपलं मत व्यक्त केलं आहे

केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी दिल्लीत माध्यमांशी बोलताना राज्यात लवकरच भाजपाचं सरकार येईल असं विधान केलं होतं. त्यापाठोपाठ विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी देखील तशाच प्रकराचं विधान केलं होतं.
महाराष्ट्र सरकार भेदभाद करत असल्याच्या आरोपावर बोलताना नारायण राणे म्हणाले होते की, “महाराष्ट्रात भाजपाचं सरकार नाही त्यामुळे तिथं तसं होतंय. लवकरात लवकर महाराष्ट्रात भाजपाचं सरकार येईल आणि तुम्हाला अपेक्षित बदल दिसेल. माझ्या आतमध्ये जी गोष्ट आहे ती आत्ताच बाहेर सांगायची नाहीये. एखादं सरकार पाडायचं असेल आणि नवं सरकार स्थापन करायचं असेल तर काही गोष्टी गुपित ठेवाव्या लागतात. अशा ठिकाणी काही बोललो तर आणखी एखादा महिना पुढे ढकलेल.”
तर, “सरकार तर भाजपाचं येणारचं, फक्त आता आम्ही भविष्यवाणी आज, उद्या, परवा करत नाही. पण महाराष्ट्राच्या भविष्यासाठी भाजपाच्या सरकार शिवाय पर्याय नाही. हे तीन तिघाडं सरकार महाराष्ट्राचं हीत करू शकत नाही. कारण, सरकार चालवत असताना तुम्हाला एक वाक्यता लागते, समन्वय लागतो, निर्णय क्षमता लागते, वेळ द्यावा लागतो. मुख्यमंत्री महाराष्ट्रासाठी वेळ देताना दिसत नाहीत. त्यामुळे महाराष्ट्रामधील सगळे प्रकल्प ठप्प आहेत. आरक्षणाचे विषय प्रलंबित आहेत. आरक्षणाची गाजरं दाखवतात, मराठा समजाला आज आरक्षण मिळालेलं नाही. त्यामुळे या सगळ्यावर जर महाराष्ट्राचं पुन्हा सुरळीत कामकाज सुरू व्हायला पाहिजे, तर या राज्याला सद्यस्थिती भाजपाच्या नेतृत्वाखालील सरकारचीच आवश्यकता आहे.” असं नंदुरबार येथे पत्रकारपरिषदेत बोलताना प्रवीण दरेकर म्हणाले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.