आधी भूकंप आणि आता गूढ आवाज

सोमवारी दोन ते तीन वेळा जमिनीतून मोठे आवाज आले. आवाजाला घाबरून नागरिक घराबाहेर पडले.

0

नांदेड,रयतसाक्ष : नांदेड जिल्ह्यातील देगलूर या तालुक्यातल्या कामाजीवाडी गावात सध्या भूगर्भातून गूढ आवाज येत आहेत. जमिनीतून येणाऱ्या आवाजामुळे कामाजीवाडी गावातील गावकरी भयभीत झाले आहेत.

महाराष्ट्र- कर्नाटक राज्याच्या सीमेवर कामाजीवाडी आणि हानेगाव या दोन गावात गेल्या काही दिवसांपासून जमिनीतून आवाज येत आहेत. सोमवारी दोन ते तीन वेळा जमिनीतून मोठे आवाज आले. आवाजाला घाबरून नागरिक घराबाहेर पडले.

भूकंपाच्या भीतीने गावकऱ्यांनी संपूर्ण रात्र जागून काढली. जमिनीतून आवाज का येत आहेत. याची तपासणी करावी अशी गावकऱ्यांची मागणी आहे. हानेगावमध्ये देखील अशीच परिस्थिती आहे. यापूर्वी २६ नोव्हेंबर रोजी कामाजीवाडी येथे भूकंपाचे सौम्य धक्के जावणले होते. २६ नोव्हेंबर रोजी दुपारी 3 वाजून ५८ मिनिटाला भूकंपाचा धक्का बसला होता.

त्या धक्क्याची तीव्रता १.५ रिश्टर स्केल इतकी होती.
नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या भूमापक यंत्रावर ही नोंद झाली होती . तेव्हा पासून नागरिक भयभीत आहेत. दरम्यान काही वर्षांपूर्वी नांदेड शहरातील श्रीनगर, भाग्य नगर, पोलीस कॉलनी भागात देखील अशाच पद्धतीने भूगर्भातून आवाज येत होते. तज्ञांंनी  त्याचा अभ्यास केला मात्र कोणताच निष्कर्ष निघाला नाही. कामाजीवाडी आणि हानेगावात देखील अनेक वेळा जमिनीतून आवाज येत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.