शेतकऱ्यांनो सावधान..! कारखान्याच्या कोण्याही करारावर सही करू नका- प्रल्हाद इंगोले

अन्यथा शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काच्या पैशांपासून मुकावे लागेल

0

 

नांदेड, रयतसाक्षी : ऊस उत्पादक शेतकर्यांनी भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्यासह अन्य कोण्याही कारखान्याच्या कर्मचा-र्यांनी आणलेल्या करारावर /कागदपत्रांवर शेतकर्यांनी कसल्याही प्रकारची सही करू नये अन्यथा शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काच्या पैशांपासून मुकावे लागेल असा सावधानतेचा इशारा शिवसेनेचे शेतकरी नेते तथा ऊस दर नियंत्रण मंडळाचे माजी सदस्य प्रल्हाद इंगोले यांनी शेतकर्यांना दिला आहे .

गाळप हंगाम २०१४-१५ मध्ये कारखान्यांनी शेतकर्यांना फार उशिरा एफआरपी रक्कम दिली होती. त्यामुळे उशीरा दिलेल्या एफआरपी रकमेवरील विलंब व्याज मिळावे यासाठी शेतकरी नेते प्रल्हाद इंगोले यांनी हायकोर्टात याचिका दाखल करून सात वर्ष सतत पाठपुरावा केला.

या प्रदीर्घ लढ्याला यश येऊन हायकोर्ट व साखर आयुक्त यांच्या आदेशावरून २०१४-१५ चे विलंब व्याज आकारणी करून सदरील रक्कम शेतकर्यांना देण्याचे आदेश काढले. व्याज देण्याच्या बाबतीतली ही साखर उद्योगातील पहिली घटना आहे नांदेड विभागात वीस कारखान्याकडे सव्वीस कोटी रूपयाची व्याज आकारणी झालेली आहे पैकी एकटय़ा भाऊराव कारखान्यांकडे सहा कोटी रुपये व्याज निघाले आहे.

परंतु पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या अधिपत्याखाली चालणार्या भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखाना काही केल्या शेतकर्यांना व्याजाचे पैसे देण्यास तयार नाही वेगवेगळ्या पळवाटा करत शेतकर्यांना पैसे देण्याची टाळाटाळ कारखाना करीत आहे. त्यामुळेच त्यांनी कर्मचार् यांच्या मार्फत शेतकर्यांकडून आम्हाला पैसे नको आहेत व्याजाच्या पैशांवरील आमचा हक्क आम्ही सोडत आहोत अशा आशयाचे सहमतीपत्र शेतकऱ्यांकडून भरून घेतले जात आहेत .

त्यामुळे भविष्यात शेतकर्यांंना मिळणारे पैसे शेतकर्यांच्यानिच सहमती दिल्यामुळे ते मिळणार नाहीत . म्हणून शेतकऱ्यांनी कारखाना व कारखान्याच्या कर्मचार्यांनी आणलेल्या कागदपत्रांची पूर्ण शहानिशा करून वाचावे. आम्हाला पैसे नको आहेत आम्ही आमचा हक्क सोडत आहोत आम्ही तीन टप्प्यांत एफआरपी घेण्यास तयार आहोत अशा प्रकारचे करार किंवा सहमतीपत्र असतील तर त्यावर शेतकर्यांनी कसल्याही प्रकारची सही करू नये अन्यथा आपण आपल्या हाताने आपल्याच पायावर दगड मारून घेतल्यासारखे होइल .

कारखानदार आपल्या मर्जीतल्या काही कार्यकर्त्यांना पुढे करून शेतकर्यांना भीती घालून दबाव टाकून त्यांच्या अज्ञानाचा , मजबुरीचा गैरफायदा घेऊन करारपत्रावर शेतकऱ्यांच्या असं या घेत आहेत त्याविरोधात सगळ्यांनी एकत्रित आवाज उठवणं गरजेचं आहे.

म्हणून कोणत्याही गावातील शेतकर्यांनी अशा प्रकारापासून सावध राहावे व कारखानदारांना सहमती देऊ नये असे आवाहन शिवसेनेचे शेतकरी नेते तथा ऊस दर नियंत्रण मंडळाचे माजी सदस्य प्रल्हाद इंगोले यांनी केले आहे .

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.