राष्ट्रवादीकडून उमेदवारांची चाचपणी

इच्छुकांची भाउगर्दी , राज्याच्या युवा नेतृत्वावर कमान

0

शिरुर कासार , रयतसाक्षी (दि.३): शिरुर कासार नगरपंचायतच्या सार्वत्रिक निवडणूकांसाठी भाजपासह महाविकास आघाडीतील घटकपक्षांनी इच्छुकांची चाचपणी सुरु केल्याने थंडीच्या कडाक्यात राजकारण चांगलेच तापु लागले आहे. शुक्रवारी (दि. ३ ) राष्ट्रवादी युवा चे प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख यांच्या नेतृत्वाखाली आमदार बाळासाहेब‌ आजबे यांनी इच्छुक उमेदवारांशी संवाद साधला .

शिरुर कासार शहर नगरपंचायतीचा सार्वत्रीक निवडणूक कार्यक्रम जाहिर झाला आहे. आरक्षण प्रक्रीयेपासूनच इच्छुक उमेदवारांनी पक्षश्रेष्ठींकडे फिडींग लावली . नेतृत्वाच्या आडून पक्षश्रेष्ठींचा विश्वास बळवण्यासाठी मातब्बर मनधरणीचा मार्ग अवलंबित आहेत.

सत्ताधारी भाजपासह महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादीकडून इच्छुकांच्या चाचपण्या केल्या जात आहेत . शिवसेनेचे माजी मंत्री जयदत्त क्षिरसागर यांनी इच्छुकांशी संवाद साधत तयारीला लागण्याचा कानमंत्र दिल्याने उमेदवार्या जाहिर होण्यापूर्वीच राजकारण चांगलेच तापत चालले आहे.

नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या चौथ्या दिवशी शुक्रवारी (दि.३) राष्ट्रवादी युवा प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख यांच्या नेतृत्वाखाली आमदार बाळासाहेब आजबे यांनी शहरातील सर्व १७ प्रभागाच्या इच्छुक उमेदवारांशी संवाद साधत प्रभाग निहाय चाचपणी केली यावेळी इच्छुक उमेदवारांसह शहरातील मतदार उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.