थांबलेल्या रिक्षातून महिलेचा वेदनादायी आवाज, रस्त्यातच प्रसूती; भगवान कांबळे,पोलिसांच्या सतर्कतेने महिलेचे वाचले प्राण

भगवान कांबळे यांचे तेलंगणामध्ये ही कौतुक

0

नांदेड , चंद्रकांत गव्हाणे रयतसक्षी: धर्माबाद ,मंगळवारी रात्री साडे बाराच्या सुमारास महीलेला प्रसूतीच्या वेदना होऊ लागलेल्या मातेला घेऊन जाणारी रिक्षा फकीराबाद रोडवर अचानक बंद पडली. रिक्षातच सदर महिलेला प्रसूती कळा आल्या आणि त्यातच तिची प्रसूती झाली. थांबलेल्या रिक्षातून महिलेचा आवाज येत होता मंगळवारी रात्री साडेबाराच्या सुमारास फकीराबाद रोडवरील वाहतूक तशी कमी होती. फकीराबाद पेट्रोल पंप पासून थोडं पुढे उभ्या असलेल्या एका रिक्षातून महिलेच्या वेदनेचा आवाज ऐकू येत होता. पोलीस पेट्रोलिंग वर पोलिस आपले कर्तव्य बजावत होते. रस्त्यावर कोणत्या ऑटो कार गाडीची वाट पा‌हत होते तेव्हढ्यात निझामाबाद वरून पेशंट सोडून धर्माबाद चे सामाजिक कार्यकर्ते भगवान कांबळे यांची जिवन संघर्ष रुग्णवाहिका येत होती ती रुग्णवाहिका थांबून‌ त्यांना पोलिसांनी सर्व घटना सांगितले. माता,बाळाला तत्काळ निझामाबाद येथील शासकीय रुग्णालयात घेऊन जा अशी त्या महिलेचे नातेवाईक व पोलिस कर्मचारी यांनी भगवान कांबळे यांना विनंती केली. भगवान कांबळे यांनी रुग्णवाहिका निजामाबाद कडे वळवली भगवान यांनी घटनास्थळी धाव घेतली. तेव्हा एका महिलेने रस्त्यावरच  बाळाला जन्म दिल्याचे दिसले. भगवान यांनी आपले सहकारी मित्राच्या मदतीने तत्काळ त्या महिलेला रुग्णवाहिका त्यातून महिलेला निजामाबाद शासकीय रुग्णालयात निशुल्क पोहोचवले . तिथे बाळा ला व मातेला त्वरीत उपचार मिळाल्याने बाळ आणि आई सुखरूप आहेत.

देवाच्या रुपाने धावून आले भगवान कांबळे बाळातीन मातेच्या तोंडून उच्चार

सदर महिलेचे नाव अनुराधा गणेश राठोड असून त्या कोचडीया तंडा मंडळ फकीराबाद जिल्हा निजामबाद येथे राहतात. मंगळवारी महिलेला प्रसूती कळा सुरु झाल्यानंतर रुग्णवाहिका मिळवण्याचा प्रयत्न कुटुंबियांचा सुरु होता. मात्र  रुग्णवाहिका न मिळाल्याने त्यांनी रिक्षा बोलावली. पण ती वाटेतच बंद पडल्यानंतर आम्ही सर्वजण घाबरलो होतो तेवढ्यातच भगवान हे देवाच्या रूपाने जीवन संघर्ष रुग्णवाहिका व भगवान कांबळे

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.