बीडमध्ये ३० वर्षीय तरुणाचा दोन तरुणींकडून विनयभंग

वाईट हेतूने त्याचा हात धरला आणि त्याला मिठी मारून विनयभंग केला.

0

बीड, रयतसाक्षी : तरुणीचा विनयभंग झाल्याचं आपण ऐकलं असेल मात्र बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई शहरात दोन मुलींनी 30 वर्षीय तरुणाच्या घरी गेल्या. वाईट हेतूने त्याचा हात धरला आणि त्याला मिठी मारून विनयभंग केला.

इतकंच नाही, तर त्याला जीवे मारण्याची धमकीही दिली. या प्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात पोलिसांनी दोन तरुणींसह त्यांच्यासोबत असलेल्या एका तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने शहरात खळबळ उडाली असून घटनेची सध्या या जिल्ह्यात चर्चा सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई शहरात दोन तरुणींनी एका मुलाच्या मदतीने 30 वर्षीय तरुणाचा विनयभंग केल्याची घटना घडली. अंबाजोगाई शहरातील एका वसाहतीत राहत असलेल्या 30 वर्षीय तरुणासोबत हा प्रकार घडला आहे.

एका मुलाला घेऊन दोन तरुणी 30 वर्षीय तरुणाच्या घरी गेल्या. वाईट हेतूने त्याचा हात धरला आणि त्याला मिठी मारून विनयभंगकेला. त्यानंतर तरुणींनी त्या तरुणाला शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकीही दिली. ही घटना 11 डिसेंबर रोजी सकाळी अंबाजोगाई शहरातील एका वसाहतीत घडली आहे.

दरम्यान,या प्रकरणी पीडित तरुणाच्या फिर्यादीवरून बबलू बाळू घाडगे, आशा बाळू घाडगे आणि वैशाली श्याम काळम सर्व राहणार लाल नगर, अंबाजोगाई यांच्याविरुद्ध अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करत आहेत.

या घटनेनंतर आंबेजोगाई शहरात चर्चेला उधाण आले आहे. तसंच गुन्हा दाखल झालेल्या आरोपीला आत्तापर्यंत पोलिसांनी अटक केले नाहीतर या मुलींना अटक करून न्याय द्यावा, अशी मागणी पीडित तरुणाने केली आहे.

यापूर्वी अंबाजोगाई शहरात 400 लोकांनी एका अल्पवयीन तरुणीवर अत्याचार केल्याची घटना समोर आली होती. या घटनेमुळे संपूर्ण देश हादरून गेला होता. त्यानंतर आता तरुणाचा विनयभंग झाल्याची विचित्र घटना समोर आल्याने पुन्हा चर्चेला उधाण आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.