पशुसंवर्धन विभाग वैयक्तीक लाभाच्या योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करावेत-प्रदिप सरवदे

ग्रामीण भागातील नाविन्यपूर्ण राज्य,जिल्हास्तरीय योजने अंतर्गत दुधाळ गाई, म्हैस, शेळीचे गट वाटप करणे, -

0

शिरूर,रयतसाक्षी : बेरोजगार युवकांसह पशुपालक व शेतकरी बांधवांना स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध करुन देत, त्यांना शाश्वत अर्थाजनाचा पर्याय उपलब्ध करुन देणाऱ्या पशुसंवर्धन विभागाने विविध वैयक्तिक लाभाच्या योजनांची प्रक्रीया अधिक पारदर्शक करण्यासाठी गेली तीन वर्षे ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविणे व ‘लाभार्थ्यांची निवड करण्याची पध्दत सुरु केली आहे. याच बरोबर जिल्हास्तरीय विविध योजनांसाठी संगणक प्रणाली लागू करण्यात येत आहे.

मेंढी गट वाटप करणे, १ हजार मांसल कुक्कुट पक्षांच्या संगोपनासाठी निवारा शेड उभारणीस अर्थ सहाय्य देणे, १०० कुक्कुट पिलांचे वाटप व २५ अधिक ३ तलंगा गट वाटप या योजनांसाठी ऑनलाईन पध्दतीने लाभार्थी निवड प्रक्रीया सन २०२१-२२ या वर्षात राबविली जाणार आहे.

पशुपालकांना डेअरी, पोल्ट्री किंवा शेळी पालन यापैकी ज्या बाबींमध्ये अर्ज करावयाचा आहे त्याची निवड करण्याची सुविधा देखील उपलब्ध करुन देण्यात आली आहे. पशुपालक/ शेतकरी बांधव, सुशिक्षीत बेरोजगार युवक-युवती व महिलांनी या योजनांचा लाभ

घेण्यासाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करण्याचे आवाहन पशुसंवर्धन विभागाच्यावतीने करण्यात आले आहे. ऑनलाईन अर्ज https:// ah.mahabms.com या संकेतस्थळावर करावे.

योजनांची माहिती तसेच अर्ज करण्याची पध्दत याबाबतचा संपूर्ण तपशिल या संकेतस्थळावर तसेच मोबाईल पवर उपलब्ध आहे. अर्ज फक्त ऑनलाईन पध्दतीनेच स्विकारले जातील. या संगणक प्रणालीमध्ये अर्ज भरणे अत्यंत शुलभ करण्यात आले असून अर्जामधील माहिती कमीत कमी टाईप करावी लागेल. बहुतांशी माहितीबाबत पर्याच निवडण्याची

अर्ज भरतांना अर्जदारांने नोंदविलेल्या मोबाईल क्रमांकावर 17 अर्जाच्या स्थितीबाबत संदेश पाठविण्यात येणार असल्याने कोणत्याही परिस्थितीत अर्जदाराने योजने अंतर्गत आपला मोबाईल क्रमांक बदलवू नये. अधिक माहितीसाठी टोल फ्री क्रमांकावराय किंवा तालुक्याच्या पशुधन विकास अधिकारी (विस्तार), पंचायती समिती, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारीक अथवा जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालय, तालुका लघु पशुवैद्यकीय… सर्व चिकीत्सालय अथवा नजीकच्या पशु वैद्यकीय केंद्रावर संपर्क साधण्याचे अवाहन करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.