गर्भवती पत्नीसह पतीचा मृतदेह सापडल्याने खळबळ

नेमकं काय घडलं ज्यामुळे पती पत्नीने आत्महत्ये सारख टोकाचं पाऊल उचलले याचा शोध पोलीस घेत आहेत .

0

बीड, रयतसाक्षी: गर्भवती पत्नीसह पतीने गळफास घेत आत्महत्या केल्याने वैतागवाडी गावात खळबळ उडाली आहे. आत्महत्येचे कारण अद्याप समोर आलेले नाही मात्र अकरा महिन्यात नेमकं काय घडलं ज्यामुळे पती पत्नीने आत्महत्ये सारख टोकाचं पाऊल उचलले याचा शोध पोलीस घेत आहेत .

नेकनूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वैतागवाडीकरांना धक्का बसणारी घटना उघडकीस आली आहे.गावातील राजेश जगदाळे आणि दीपाली जगदाळे या पती पत्नीचे मृतदेह घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले.

मागील वर्षी म्हणजे अकरा महिन्यांपूर्वी या दोघांचा विवाह झाला होता.संसार सुरळीत सुरू होता,दीपाली ही गर्भवती असल्याने आनंदाचे वातावरण होते,गुरुवारी दुपारी शेतातून परत आलेल्या राजेश च्या आई वडिलांनी दार वाजवले मात्र ते उघडले जात नसल्याने इतरांच्या मदतीने उघडल्यानंतर धक्कादायक प्रकार समोर आला.

दीपाली चा मृतदेह पलंगावर तर राजेश चा मृतदेह लोखंडी अँगल ला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला.घटनेची माहिती मिळताच नेकनूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून अधिक तपास सुरू आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.