पतीची हत्या करून मृतदेह‌ शेतात जाळला

सिनेमाच्या पटकथा प्रमाणे , पत्नीकडून संतापाच्या भरात पतीची हत्या

0

 

हिंगोली, रयतसाक्षी : जमीन विकल्याच्या कारणावरून भांडण झालं… वाद टोकाला गेला आणि मारहाण झाली… संतापाच्या भरात हत्या आणि मग पुरावे नष्ट करण्यासाठी रात्रीतूनच मृतदेह शेतात नेऊन जाळला. एखाद्या सिनेमा व मालिकेची पटकथा वाटावी अशी घटना हिंगोली जिल्ह्यात घडलीये.

जमीन विकल्याच्या कारणावरुन पतीला पत्नी आणि दोन मुलांनी मारहाण करत हत्या केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

कळमनुरी तालुक्यातील बेलमंडळ गावात शेतकरी अवधूत मुधोळ पत्नी आणि दोन मुलांसह राहायचे. शेती विकल्याच्या कारणावरून पत्नी आणि दोन मुलांचे अवधूत मुधोळ यांच्यासोबत वाद सुरू होता. बुधवारी रात्री याच विषयावरुन अवधूत मुधोळ आणि पत्नीसह दोन मुलांचं भांडण सुरू झालं. वाद विकोपाला गेला आणि पत्नीसह दोन्ही मुलांनी अवधूत मुधोळ यांना बेदम मारहाण केली. या मारहाणीत मुधोळ यांचा जीव गेला.

अवधूत मुधोळ यांचा मारहाणीत मृत्यू झाल्याचं कळल्यानंतर पत्नी आणि दोन्ही मुलांनी पुरावे नष्ट करण्यासाठी आणि याची गावात वाच्यता होऊ नये म्हणून मयताचा (अवधूत मुधोळ) मृतदेह शेतात नेला. पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने आरोपींनी रात्रीतूनच शेतात मृतदेह जाळून टाकला.

 

  • असे उकलले गुड:
    शेतात मृतदेह जाळल्याचं शेजारील शेतकऱ्यांच्या निदर्शनात आलं आणि त्यानंतर खुनाच्या घटनेला वाचा फुटली. घटनेची माहिती मिळताच बाळापुर पोलिसांनी काही तासांमध्येच आरोपी अन्नपूर्णा मुधोळ (अवधूत मुधोळ यांची पत्नी), मुलगा लक्ष्मण व ओंकार यांना अटक केली आहे. खून केल्यानंतर तिन्ही आरोपी पळून जाण्याच्या तयारीत होते, अशी माहिती पोलीस अधिकारी पंढरीनाथ बोधनापोड यांनी दिली.
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.