पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई:राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांना अटक,

टीईटी परीक्षांमध्ये गैरप्रकारणाच्या संदर्भात राज्य शासनाच्या परीक्षा विभागाकडून प्रमुख तुकाराम सुपे यांना अटक करण्यात आली आहे.

0

रयतसाक्षी : राज्य सरकारच्या परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणामध्ये महत्वाची कारवाई करण्यात आली आहे. पेपरफुटी प्रकरणात महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांना अटक करण्यात आली आहे. पुणे पोलिसांच्या सायबर सेलकडून तुकाराम सुपे यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. चौकशी नंतर त्यांना अटक करण्यात आली आहे.

पुण्याचे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार टीईटी परीक्षांमध्ये गैरप्रकारणाच्या संदर्भात राज्य शासनाच्या परीक्षा विभागाकडून प्रमुख तुकाराम सुपे यांना अटक करण्यात आली आहे. शिक्षक पात्रता परीक्षेत लाच घेऊन विद्यार्थ्यांना पास केल्याचा आरोप तुकाराम सुपेंवर आहे. राज्य शासनाच्या परीक्षा विभागाचे प्रमुख तुकाराम सुपे यांना अटक केल्याने एकच खळबळ उडाली आहे.

म्हाडा पेपरफुटी प्रकरणातील मुख्य आरोपी प्रीतीश देशमुख यांच्या घरझडतीमध्ये सायबर पोलिसांच्या हाती 2020 मध्ये टीईटी परीक्षेत अपात्र काही विद्यार्थ्यांची हॉलतिकिटे लागली होती. दरम्यान, टीईटी परीक्षेशी निगडित असलेल्या महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांची पोलिसांनी चौकशी केली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.