राष्ट्रवादी तुपाशी शिवसेना उपाशी !

महाविकास आघाडीच्या सरकारमधे निधी मिळविण्यात राष्ट्रवादी काँग्रेस अव्वल , तर मुख्यमंत्री असलेल्या शिवसेनेच्या वाट्याला सर्वात कमी निधी

0

 

रयतसाक्षी: महाराष्ट्रात महाविकास आघाडी म्हणजेच शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांची सत्ता आहे. मात्र सरकार स्थापन झाल्यापासून या तिन्ही पक्षांमध्ये काही आलबेल नसल्याचे वृत्त वारंवार समोर येत असते.

दरम्यान आता असेच हे वृत्त समोर आले आहे. निधी वाटपात देखील या तिन्ही पक्षांमध्ये मोठी असमानता झाली असल्याचे मीडिया रिपोर्ट्समध्ये बोलले जात आहे. राज्यामध्ये शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे. मात्र ज्या पक्षाचा मुख्यमंत्री त्याच पक्षाच्या वाट्याला सर्वात कमी निधी आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस निधी मिळवण्यात सर्वा अव्वल आहे.

 

महाविकास आघाडी सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा क्रमांक हा दुसरा आहे. मात्र असे असताना देखील राष्ट्रवादी निधी मिळवण्यात पहिल्या क्रमांकावर आहे. तर सर्वाधिक संख्याबळ आणि मुख्यमंत्रीपद स्वत:कडे आहे. तरी देखील शिवसेना निधी मिळण्यात सर्वात मागे आहे.

बजेटमधून मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेस हा बजेट मिळवणारा सर्वात मोठा पक्ष आहे. यानंतर दुसऱ्या क्रमांकावर काँग्रेस आणि सर्वात शेवटी शिवसेनेचा क्रमांक लागतो. महत्त्वाचे म्हणजे मुख्यमंत्र्यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांच्या पर्यावरण खात्यालाही मोठा फटका बसला आहे.

 

पर्यावरण खात्याकडे ४२० कोटींची तरतूद आहे. मात्र तरी देखील आतापर्यंत फक्त ३ टक्के म्हणजे १४ कोटींचा खर्च करण्यात आलेला आहे. जर आदित्य ठाकरेंच्या खात्याचीच ही अवस्था असेल तर शिवसेनेच्या इतर मंत्र्यांची काय स्थिती असू शकते हे दिसते.

आघाडी सरकारमधील पक्षांचा निधी

शिवसेना ५६ आमदार : निधी५२२५५ कोटी
काँग्रेस ४३ आमदार : निधी १०००२४ कोटी
राष्ट्रवादी काँग्रेस ५३ आमदार : निधी २२४४११ कोटी

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.