शिरूरमध्ये प्रचाराची रणधुमाळी

आमदार सुरेश धस, बाळासाहेब आजबेंच्या प्रभाग फे-या तर माजी मंत्री जयदत्त क्षिरसागर संवाद दौरा राष्ट्रवादीतील मातब्बरांच्या सभा ; मंत्री , पदाधिका-यांची हजेरी

0

शिरूर कासार, रयतसाक्षी : नगरपंचायत निवडणूक उमेदवारांची प्रचार रणधुमाळी जोरात सुरू आहे. शिरूरकर भाजपा, राष्ट्रवादी, शिवसेना अश्या तीरंगी लढतीचा सामना अनुभव घेत असले तरी काही प्रभागात अपक्षांनी प्रचारात दंड थोपटले आहेत .

नगरपंचायतीच्या सार्वत्रीक निवडणूकीत बहूमताचा आकडा सर करण्यासाठी भाजपा चे आमदार सुरेश धस , राष्ट्रवादी चे आमदार बाळासाहेब आजबे यांनी प्रभाग फेरीतून मतदारांच्या गाठी भेटीवर भर दिली आहे. शिवसेनेचे माजी मंत्री जयदत्त क्षिरसागर संवाद दौ-या माध्यमातून मतदारांशी थेट संवाद साधत आहेत.

मतांचं पारडं जड करण्यासाठी उमेदवारांकडून प्रचारासाठी फ्लेक्स, पाॅम्पलेट, झेंडे, रूमाल, ध्वनीक्षेप वाहना, बॅनर आदी साधनांचा वापर सुरू आहे. कार्यकर्त्यांना खुश करण्यासाठी जेवणावळींची मेजवानी दिली जात आहे. स्थलांतरीत मते काबीज करण्यासाठी त्यांच्या‌ येण्या- जाण्याची व्यवस्थेची व्यूव्हरचना आखली जात आखली‌ जात आहे.

सुरवातीला सहज सोप्या वाटना-या निवडणूकीमध्ये भाजपा समोर राष्ट्रवादी ने तगडे उमेदवार रणांगणात‌ उतरवले असले तरी शिवसेनेच्या मोजक्या उमेदवारांनी भाजप , राष्ट्रवादी समोर चांगलंच आव्हान उभे केले आहे. शुक्रवारी (दि. ) भाजपाचे आमदार सुरेश धस सकाळी प्रभागातील मतदारांच्या गाठी-भेटी घेऊन उमेदवारांना विजयी करण्याचे अवाहन केले.

राष्ट्रवादीचे आमदार बाळासाहेब आजबे व युवा प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख यांनी दुपारनंतर प्रभाग पिंजुन काढले तर गांधी चौकात शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे , माजीमंत्री जयदत्त क्षिरसागर यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

राष्ट्रवादीचे युवा प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख यांनी बहूमताचा आकडा सर करण्यासाठी उमेदवारांच्या प्रचारार्थ पक्षातील मातब्बरांना चांगलेच कामाला लावल्याचे चित्र आहे.

संध्याकाळी राष्ट्रवादी महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, युवती प्रदेशाध्यक्षा सक्शना सरगर , मानवी हक्क अभियानाचे अध्यक्ष डॉ. मिलिंद आव्हाड, आमदार बाळासाहेब आजबे यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे .

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.