चोरट्यांनी दुचाकीवरून पाठलाग करत लूटले

मुदखेड बारड रोडवरील घटना; सात हजार नगदी, मोबाईल,घडी लंपास

0

नांदेड रयतसाक्षी , चंद्रकांत गव्हाणे : मुदखेड- बारड या रहदारी च्या रस्त्यावर गुरूवारी (दि.१६) रात्री ९:२० दरम्यान सुर्यकांत पुंडलीकराव पिन्नलवार हे बारड हून मुदखेड कडे मोटरसायकलवरून जात असताना दोन अज्ञात चोरट्यांनी दुचाकीवरून पाठलाग करुन खाली पाडले चाकुचा धाक दाखवून सात हजार रुपये रोख आणि मोबाईल, घडी, दुचाकीची चावी घेऊन पसार झाल्याची घटना घडली आहे.

या घटनेची माहिती मिळताच मुदखेड पोलीस निरीक्षक महेश शर्मा, सय्यक पोलीस उपनिरीक्षक वटाने, व बारडचे पोलीस साय्यक पोलीस उपनिरीक्षक तुगावे तसेच पोलीस कर्मचारी यांनी शाहणे यांच्या शेता समोर मुख्य रस्त्यावर घटनास्थळी पाहणी केली.

यापुर्वीही एक महिना झाला असंच दुचाकी आडवून एकास लूटले होते तर दुसरीकडे मुगट ब्राह्मणवाडा रोडवरील खड्ड्यांचा फायदा घेऊन चोरटे दुचाकी वाहन धारकांना अडविण्याच्या घटनांत वाढ होत असल्याने नागरिकां मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वाटसरू नागरिकांच्या सुरक्षेसाठी रात्री या परिसरात पोलिसांची गस्त वाढवावी मागणी होत आहे .

सुर्यकांत पिन्नलवार यांच्या फिर्यादीवरून मुदखेड पोलिसांत भादवी कलम ३९२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आले.

पुढील तपास पोलीस निरीक्षक महेश शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस जमादार श्री. गीते करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.